खांद्याच्या ऑपरेशननंतर श्रेयस अय्यर काय म्हणाला पहा

iyer
iyer

शुक्रवारी 9 एप्रिल रोजी आयपीएल 2021 (ipl 2021) सुरू होणार आहे. हंगाम सुरू होण्यापूर्वीच दिल्लीचा पूर्व कप्तान श्रेयस अय्यर जखमी झाल्याने, दिल्ली कॅपिटलच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. मात्र, नंतर संघाने वृषभ पंतला कर्णधार म्हणून नेमले आहे. दरम्यान, गुरुवारी श्रेयस अय्यर म्हणाला, त्याच्या खांद्याच्या दुखापतीची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे आणि शक्य तितक्या लवकर तो मैदानात परत येण्याचा प्रयत्न करेल. श्रेयस अय्यर यांने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करुन याबाबत माहिती दिली आहे. सेलिब्रिटीचे स्टायलिस्ट आलिम हकीम यांनीही या पोस्टवर भाष्य केले आहे. इतकेच नाही तर टीव्ही अभिनेत्री करिश्मा तन्नाने त्याला काय घडले हे विचारले आहे.

श्रेयस अय्यर याच्या या पोस्टवर, आलिम हकीम यांनी लिहिले: "तू लढाऊ आहेस. लवकरच बरे होशील अशी आशा आहे." अय्यर गेल्या महिन्यात इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत जखमी झाला होता. या कारणास्तव, तो इंडियन प्रीमियर लीगमधून बाहेर आहे. अय्यरने त्याचा फोटो टाकत ट्विट केले की, "ऑपरेशन यशस्वी झाले आणि शक्य तितक्या लवकर मी पूर्ण बरा होऊन परत येईल. तुम्ही शुभेच्छा  दिल्याबद्दल धन्यवाद."

पुण्यात 23 मार्च रोजी पहिल्या वनडे सामन्यात जॉनी बेअरस्टोचा शॉट रोखण्याच्या प्रयत्नात श्रेयस अय्यर जखमी झाला होता. यामुळे इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित सामन्यांमधून आणि आयपीएलमधूनही त्याला वगळण्यात आले. आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटलचा कर्णधार असलेला अय्यर चार महिने बाहेर क्रिकेटपासून दूर राहण्याची शक्यता आहे. त्याने लँकशायर या संघासोबत करारही केला आहे. 23 जुलैपासून सुरू होणार्‍या वनडे स्पर्धेत तो इंग्लिश काऊन्टी संघाकडून खेळण्याची शक्यता नाही. अय्यरच्या जागी दिल्लीच्या कॅपिटल्सने  वृषभ पंतला आपला कर्णधार म्हणून नेमले आहे.
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com