Coronavirus: 'गोव्यातील सिनियर खेळाडूंची स्पर्धात्मक क्रिकेटची संधी हिरावली'

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 14 मे 2021

प्रीमियर लीग स्पर्धा सलग दोन वर्षे न झाल्यामुळे गोव्यातील सिनियर क्रिकेटपटूंची स्पर्धात्मक क्रिकेटची संधी हिरावली गेली आहे.

पणजी: गोवा क्रिकेट असोसिएशनला (Goa Cricket Association) सलग दोन वर्षे कोरोना विषाणू महामारीमुळे राज्यातील प्रमुख प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा खेळविता आलेली नाही. कोविड-19 (COVID-19) मुळे नव्या मोसमातही स्पर्धेच्या आयोजनाबाबत संभ्रम असेल.गेल्या वर्षी जीसीएने प्रीमियर लीग स्पर्धेची घोषणा केली होती, परंतु कोविड-19 देशव्यापी लॉकडाऊनमुळे (Lockdown) ऐनवेळी स्पर्धेचे वेळापत्रक गुंडाळून ठेवावे लागले होते. या वर्षी सय्यद मुश्ताक अली करंडक टी-20 आणि विजय हजारे करंडक (Vijay Hajare Trophy) एकदिवसीय या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा संपल्यानंतर मार्च महिनाअखेरीस प्रीमियर लीग स्पर्धा खेळविण्याबाबत जीसीएची जुळवाजुळव सुरू होती, पण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) कोरोना विषाणू महामारीच्या पार्श्वभूमीवर कोणतीही स्पर्धा न घेण्याचे निर्देश दिल्याने जीसीएने स्पर्धा रद्द केल्याचे जाहीर केले. जीसीएने गतवर्षी महामारीमुळे वार्षिक कॉर्पोरेट लीग स्पर्धाही घेतली नव्हती.(Senior players in Goa missed out on competitive cricket)

Tokyo Olympics : जपानमध्ये भारतीयांना नो एन्ट्री; खेळाडू कसे पोहचणार?

प्रीमियर लीग स्पर्धा सलग दोन वर्षे न झाल्यामुळे गोव्यातील सिनियर क्रिकेटपटूंची स्पर्धात्मक क्रिकेटची संधी हिरावली गेली आहे. कोविडच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक पाहता, या वर्षअखेरपर्यंत जीसीए स्पर्धा घेण्याचे धाडस करणार नाही असे सूत्राचे म्हणणे आहे. बीसीसीआयच्या कच्च्या नियोजनानुसार, या वर्षी डिसेंबर ते पुढील वर्षी मार्च या कालावधीत रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा होऊ शकते. त्यामुळे कोविडची लाट ओसरल्यास जीसीएला पुढील वर्षी एप्रिलमध्येच प्रीमियर लीग अथवा कॉर्पोरेट लीग स्पर्धा घेणे शक्य होईल, पण सध्या सारे अंदाजच आहे, असे सूत्राने नमूद केले. महामारीमुळे 2020-21 मोसमात बीसीसीआय रणजी करंडक स्पर्धा घेऊ शकले नव्हते.

Ashes 2021: 26 वर्षांनंतर प्रथमच अ‍ॅशेजचा अंतिम सामना गाबा स्टेडियमवर

बांदोडकर लीगही अशक्य
पणजी जिमखान्याने बांदोडकर करंडक बाद फेरी क्रिकेट स्पर्धा या वर्षी फेब्रुवारी ते  एप्रिल या कालावधीत घेतली, त्यानंतर गोव्यातील प्रमुख संघ आणि एलिट खेळाडूंचा समावेश असलेल्या लीग स्पर्धेचे नियोजन होते, पण राज्यात महामारीचा लाट तीव्र झाल्याने पणजी जिमखान्याने धोका पत्करला नाही. या वर्षअखेरपर्यंत कांपाल येथील बांदोडकर मैदानावर लीग स्पर्धा होणे विविध तांत्रिक कारणास्तव अशक्य असल्याची माहिती सूत्राने दिली. पणजी जिमखाना वास्तू आणि बांदोडकर मैदानाच्या नूतनीकरणानंतर 2015 नंतर यंदा प्रथमच बाद फेरी स्पर्धा झाली, पण महामारीमुळे लीग स्पर्धेला मुहूर्त सापडला नाही.  

 

संबंधित बातम्या