गोव्याचे नेतृत्व अष्टपैलू शिखाकडे; सीनियर महिला एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेसाठी संघ जाहीर

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 3 मार्च 2021

भारतीय महिला क्रिकेट संघातील स्थान गमावलेली शिखा पांडे हिला राष्ट्रीय संघात पुनरागमन करण्याची संधी लाभणार आहे. जयपूर येथे होणाऱ्या सीनियर महिलांच्या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत 31 वर्षीय अष्टपैलू खेळाडू गोव्याचे नेतृत्व करेल.

पणजी : भारतीय महिला क्रिकेट संघातील स्थान गमावलेली शिखा पांडे हिला राष्ट्रीय संघात पुनरागमन करण्याची संधी लाभणार आहे. जयपूर येथे होणाऱ्या सीनियर महिलांच्या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत 31 वर्षीय अष्टपैलू खेळाडू गोव्याचे नेतृत्व करेल. महिलांची एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा 11 मार्चपासून देशातील वेगवेगळ्या केंद्रांवर जैवसुरक्षा वातारणात खेळली जाणार आहे. गोव्याचा एलिट क गटात समावेश असून या गटातील सामने राजस्थानमधील जयपूर येथे खेळले जातील. या गटात गोव्यासह आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान व चंडीगड या संघांचा समावेश आहे. गोव्याचा पहिला सामना 12 मार्च रोजी होईल.

I League : चर्चिल ब्रदर्सची दुसऱ्या टप्प्यातील मोहीम शुक्रवारपासून

स्पर्धेतील सर्व संघ चार मार्च रोजी स्पर्धा केंद्रांवर एकत्र येतील. त्यानंतर सर्व खेळाडूंच्या तीन कोविड-19 चाचणी चाचणी होतील. 10 व 11 मार्च रोजी संघाच्या सराव सत्रास सुरवात होईल. शिखा अष्टपैलू खेळाडू असून भारतीय संघाची प्रमुख वेगवान गोलंदाज आहे. तिने 52 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांत 73 विकेट घेतल्या आहेत, तर 50 टी-20 आंतरराष्ट्रीय लढतीत 36 जणींना बाद केले आहे. मात्र या अनुभवी खेळाडूस दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी क्रिकेट मालिकेसाठी भारतीय संघात स्थान मिळालेले नाही. राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत जोमदार कामगिरी करून शिखाला राष्ट्रीय निवड समितीचे लक्ष वेधण्याची संधी असेल.

डेल स्टेनच्या वक्तव्यावर अजिंक्य रहाणेची मोठी प्रतिक्रीया

गोव्याचा महिला क्रिकेट संघ

शिखा पांडे (कर्णधार), विनवी गुरव, तेजस्विनी दुर्गड, संजुला नाईक, सुनंदा येत्रेकर, निकिता मळीक, रूपाली चव्हाण, दीक्षा गावडे, सावली कोळंबकर, सुगंधा घाडी, सोनाली गवंडर, पूर्वजा वेर्लेकर, दीक्षा आमोणकर, सयानी राऊत देसाई, मंजुश्री भगत, इब्तिसाम शेख, तानिया पवार, पूर्वा भाईडकर, दिव्या नाईक, सिया देसाई व रेहना कामत.

गोव्याचे स्पर्धा वेळापत्रक

तारीख 12 मार्च – विरुद्ध चंडीगड, तारीख 14 मार्च – विरुद्ध राजस्थान, तारीख 16 मार्च – विरुद्ध महाराष्ट्र, तारीख 18 मार्च – विरुद्ध उत्तर प्रदेश, तारीख 20 मार्च – विरुद्ध आंध्र.

 

संबंधित बातम्या