Novak Djokovic: लाईव्ह सामन्यात विरोधी खेळाडूच्या 'त्या' कृत्याने चिडला जोकोविच, पाहा Video

Video: इटालियन ओपनच्या प्री क्वार्टर फायनलमध्ये जोकोविच विरोधी खेळाडूवर थोडा चिडल्याचे दिसले होते.
Novak Djokovic Angry
Novak Djokovic AngryDainik Gomantak

Novak Djokovic angry Video: टेनिसमधील जागतिक क्रमवारीतील अव्वल क्रमांकावरील खेळाडू नोवाक जोकोविच सध्या इटालिन ओपनमध्ये खेळत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून टेनिस जगतात वर्चस्व गाजवणाऱ्या सार्बियाच्या जोकेविचने इटालियन ओपनमध्येही शानदार कामगिरी केली आहे.

दरम्यान, या स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटात त्याने उपउपांत्यपूर्व फेरीत ब्रिटनच्या कॅमेरॉन नॉरीला 6-3, 6-4 अशा फरकाने पराभूत केले. यासह त्याने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. पण या सामन्यात एका क्षणी जोकोविच काहीसा चिडलेला दिसला होता.

Novak Djokovic Angry
Novak Djokovicला कोविड लस न घेण पडलं महाग, सिनसिनाटी ओपनमधून बाहेर

झाले असे की या सामन्यात दुसऱ्या सेटमध्ये जोकोविच 2-1 अशा फरकाने पुढे होता. पण पुढच्या गेममध्ये नॉरीने पुनरागमन केले. पण नॉरीने स्मॅश केल्यानंतर चेंडू थेट जोकोविचच्या डाव्या पायाला जोरात जाऊन लागला.

त्यानंतर जोकोविच मागे वळत काहीसा चिडून नॉरीकडे पाहाताना दिसला. पण नॉरीने लगेचच त्याची माफी मागितली. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

दरम्यान, त्यापूर्वी जोकोविचने नॉरीविरुद्ध पहिला सेट सहज जिंकला होता. दरम्यान मातीच्या कोर्टवर होत असलेल्या या इटालियन ओपनमध्ये यंदा सातव्या विजेतेपदासाठी जोकोविच खेळत आहे. त्याने यापूर्वी सहा वेळा या स्पर्धेचे विजेतेपद जिंकले आहे.

Novak Djokovic Angry
Sania Mirza: 'सर्व महिलांसाठी तू...', घटस्फोटांच्या चर्चांदरम्यानच सानियासाठी पती शोएबची इमोशनल पोस्ट

या स्पर्धेत नॉरीपूर्वी उपउपांत्यपूर्व सामना खेळण्यापूर्वी जोकोविचने ग्रिगोर दिमित्रोव्हला 6-3, 4-6, 6-1 अशा फरकाने पराभूत केले होते.

दरम्यान, जोकोविच आगामी फ्रेंच ओपन स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. फ्रेंच ओपन 22 मे पासून पॅरिसमध्ये सुरू होईल. या स्पर्धेचा अंतिम सामना ११ जून रोजी होणार आहे. या स्पर्धेत जोकोविच एकून 23 वे ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या, तर तिसरे फ्रेंच ओपनचे विजेतेपद जिंकण्याच्या इराद्याने उतरेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com