सर्जियो रामोसचा रिअल माद्रिदला 'अलविदा'
Sergio Ramos bid adieu to Real Madrid

सर्जियो रामोसचा रिअल माद्रिदला 'अलविदा'

माद्रिद : फुटबॉलमधील (Football) मानच्या मानल्या जाणाऱ्या क्लबपैकी एक रिअल माद्रिद (Real Madrid) संघाचा कर्णधार सर्जियो रामोसने (Sergio Ramos) संघासोबतचा आपला करार संपवून क्लब सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सर्जियोनेने २२ अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. यात ४ चॅम्पियन्स लीग (Champions League), ५ ला लीग (La Liga) ट्रॉफीचा समावेश आहे. करार संपविण्याचा निर्णय बुधवारी सर्जियाने पत्रकार परिषदेत जाहिर केला आहे. तसेच रिअल माद्रिद संघ व्यवस्थापनाकडून याला दुजोरा देण्यात आला आहे.

सर्जियो रामोसने २००५ साली रिअल माद्रिद संघ जॉईल केला. सर्जियोने या संघाकडून ६७१ सामने खेळले आहेत. डिफेन्डर म्हणून ओळख असलेल्या या खेळाडूने १०१ गोल देखील केले आहेत. सध्या सुरु असलेल्या स्पर्धेतून त्याला कोरोना आणि पायदुखीमुळे त्याला खेळता आले नाही.

सर्जियो मागील बरीच वर्षे रिअल माद्रिद संघाकडून खेळत होता. यंदा त्याची संघव्यवस्थापनासोबत करारा बाबत सहमती झाली नाही. त्यामुळे त्याने माघार घेतल्याचे बोलले जात आहे. सर्जियोचा करार ३० जूनला संपत आहे. त्याला दोन वर्षांचा करार करण्याची इच्छा असल्याने त्यावर सहमती झाली नाही. सर्जियाने संघातून माघार घेतल्याने रिअल माद्रिदचे चहाते नाराज झाले आहेत. 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com