सेरिनियोची नजर आयएसएल संघावर

Dainik Gomantak
रविवार, 5 जुलै 2020

एफसी गोवाच्या मुख्य संघात स्थान मिळविण्यासाठी मेहनतीवर भर

पणजी

युवा बचावपटू सेरिनियो फर्नांडिस याने इंडियन सुपर लीग (आयएसएल) स्पर्धेतील संघावर नजर एकवटली असून एफसी गोवाच्या डेव्हलमेंट चमूतील या खेळाडूचे मुख्य संघात स्थान मिळविण्यासाठी अथक मेहनतीवर भर दिला आहे.

‘‘इंडियन सुपर लीग स्पर्धेतील सीनियर संघासाठी खेळण्याची स्वप्नपूर्ती हे माझे पुढील लक्ष्य आहे आणि ते शक्य झाल्यास सर्वोत्तम कामगिरी प्रदर्शित करण्याचे ध्येय आहे,’’ असे सेरिनियो याने सांगितले. पुढील पाच वर्षांत प्रगतीपथावर राहत भारताच्या राष्ट्रीय संघातून खेळण्याचेही त्याचे उद्दिष्ट्य आहे. ‘‘मला देशाचे प्रतिनिधित्व करायचे आहे आणि गोव्यातील मुलांना प्रेरित करायचे आहे,’’ असे आत्मविश्वासाने म्हणाला.

लेफ्ट बॅक जागी खेळणारा मडगावचा सेरिनियो २१ वर्षांचा आहे. एफसी गोवा डेव्हलपमेट संघाने २०१८-१९ मोसमात प्रो-लीग स्पर्धा जिंकलीतर २०१९-२० मोसमात पोलिस कप पटकावला. या दोन्ही यशात सेरिनियो याने खेळाडू या नात्याने महत्त्वपूर्ण वाटा उचलला.

स्पॅनिश फुटबॉल क्लब रियल माद्रिदचा बचावपटू मार्सेलो व्हिएरा याचा चाहता असलेला सेरिनियो याला प्रगतीपथावर राहणे आवडते. ‘‘मागील मोसमाच्या तुलनेत वर्तमान मोसमात उत्कृष्ट कामगिरी बजावण्यासाठी मी प्रयत्नरत असतो. स्वप्न साकार करण्यासाठी खडतर मेहनत आवश्यक आहे हे सुद्धा मी जाणतो,’’ असे सेरिनियो म्हणाला.

 तंदुरुस्तीस प्राधान्य

गतमोसमात एफसी गोवा डेव्हलपमेंट संघाची गोवा प्रो-लीग आणि आय-लीगच्या द्वितीय श्रेणी स्पर्धेतील मोहीम कोविड-१९ महामारीमुळे अर्ध्यावरच राहिली. डेव्हलमेंट संघात सेरिनियो प्रमुख खेळाडू होता. महामारीमुळे लागू झालेल्या लॉकडाऊन कालावधीत तंदुरुस्तीवर भर देताना संघातर्फे पाठविण्यात आलेल्या नियोजनावर आपण भर दिलातसेच घरी नियमित व्यामाम आणि सायकलिंग केलेज्यामुळे तंदुरुस्ती राखणे सोपे ठरलेअसे सेरिनियो म्हणाला.

संबंधित बातम्या