सेझा अकादमीचे २७ प्रशिक्षणार्थीं पारंगत

Dainik Gomantak
मंगळवार, 30 जून 2020

२०२० तुकडीतील फुटबॉलपटूंना आभासी व्यासपीठाद्वारे पदवी प्रदान करण्यात आल्या.

पणजी

देशभरात क्रीडा कौशल्य विकसित करण्यासाठी कटीबद्ध असलेल्या वेदांताच्या सेझा फुटबॉल अकादमीतील आणखी २७ प्रशिक्षणार्थी पारंगत होऊन कारकिर्दीसाठी सज्ज झाले आहेत. २०२० तुकडीतील फुटबॉलपटूंना आभासी व्यासपीठाद्वारे पदवी प्रदान करण्यात आल्या.

कोविड-१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम ऑनलाईन झाला. २७ प्रशिक्षणार्थींना ई-प्रमाणपत्र देण्यात आले. सेझा फुटबॉल अकादमीचे अध्यक्ष अनन्य अगरवाल, वेदांता सेझा गोवा आयर्न ओर बिझनेसचे सीईओ सौविक मझुमदार, भारताचे माजी फुटबॉल कर्णधार अर्जुन पुरस्कार विजेते ब्रह्मानंद शंखवाळकर, भारताचे माजी फुटबॉल सेझा अकादमीचे माजी प्रशिक्षणार्थी डेन्झिल फ्रांको, वेदांता लिमिटेडच्या सीएसआर समूहाच्या प्रमुख लीना वेर्णेकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला.

सेझा अकादमीची १९९९ साली स्थापना झाली. तेव्हापासून या अकादमीत गुणवान फुटबॉलपटूंच्या प्रतिभेवर पैलू पाडले जातात. आतापर्यंत सुमारे दोनशे फुटबॉलपटू या अकादमीतून प्रशिक्षित झाले आहेत.

सेझा अकादमीने आणखी २७ गुणवान खेळाडूंचा संच तयार केला आहे. ही फार आनंदाची बाब आहे. ते देशातील फुटबॉलची पुढील पिढी आहे. सेझा फुटबॉल अकादमी उदयोन्मुख फुटबॉलपटूंच्या प्रतिभेचे पालनपोषण आणि त्यांना व्यावसायिक फुटबॉलपटूच्या दृष्टिकोनातून तयार करताना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण पुरविते, असे अनन्य यांनी सांगितले. सौविक, ब्रह्मानंद, डेन्झिल यांनीही प्रशिक्षणार्थींचे अभिनंदन केले.

संबंधित बातम्या