फुटबॉल स्पर्धेत सेंट जोजफ विजेता

दैनिक गोमन्तक
बुधवार, 16 डिसेंबर 2020

मोरजी बॉयजने आयोजित केलेल्या ‘मोरजी चॅम्पियन २०२०’ चा चषक सेंट जोजफ फुटबॉल क्लबने कट्टेवाडा मोरजी क्लबवर मात करत पटकावला.

मोरजी: मोरजी बॉयजने आयोजित केलेल्या ‘मोरजी चॅम्पियन २०२०’ चा चषक सेंट जोजफ फुटबॉल क्लबने कट्टेवाडा मोरजी क्लबवर मात करत पटकावला. मोरजी मैदानावर आयोजित केलेल्या फुटबॉल स्पर्धेत कट्टेवाडा बीएससी क्लबचा पराभव करत सेंट झोजफ क्लबने २०२० चषकावर आपले नाव कोरले.

निर्धारित वेळेत दोन्ही संघांनी गोल बरोबरी राखत शेवटी पेनल्टीवर कट्टेवाडा संघावर मात केली. या स्पर्धेत विजेत्या संघास युवा उद्योजक सचिन परब पुरस्कृत २० हजाराचे व विनोद पेडणेकर पुरस्कृत ट्रॉफी सेंट जोझफ यांना तर उपविजेता संघास रोख रुपये १५ हजार व ट्रॉफी देण्यात आली. उत्कृष्ट प्रथम गोल मारणारा खेळाडू म्हणून बेन्ट फर्नांडिस, उत्कृष्ट खेळाडू नेली फर्नाडिस, सर्वाधिक गोल करणारा खेळाडू मार्सेलीन फर्नांडिस, घाब्रियल सिमोएस व जोर्डन फर्नांडिस यांना वैयक्तिक पुरस्कार मिळाले.

बक्षीस वितरण कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते रुडाल्फ फर्नांडिस, युवा कॉंग्रेस नेते सचिन परब, उपसरपंच अमित शेटगावकर, फादर फ्रान्सिस फर्नांडिस, लोरी त्रावासो, विनोद पेडणेकर, डेव्हिड डिसोझा, जॉनी रॉड्रिग्ज, पंचायत सदस्य विलास मोरजे, तुषार शेटगावकर उपस्थित होते.

आणखी वाचा:

पेनल्टी गमावलेल्या सांतानाची कमाल -

 

संबंधित बातम्या