INDvsENG : कसोटी मालिकेआधी टीम इंडियाला धक्का; हा खेळाडू खेळणार नाही

INDvsENG : कसोटी मालिकेआधी टीम इंडियाला धक्का; हा खेळाडू खेळणार नाही
Setback for Team India as Ravindra Jadeja has ruled out of the Test series against England

मुंबई :  भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांची मालिका टीम इंडियाने आपल्या खिशात घातली. कांगारूंसोबतच्या अंतिम सामन्यात तीन विकेट्स राखून भारतीय संघाने कसोटी मालिका 2 - 1 ने आपल्या नावावर केली. त्यानंतर आता भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे.

इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा काही दिवसांपूर्वीच  झाली आहे. चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने संघाची घोषणा केली असून, यात विराट कोहली, हार्दिक पांड्या आणि ईशांत शर्मा यांनी पुनरागमन केले आहे. परंतु,  या कसोटी मालिके आधीच एक धक्का बसला आहे. तो म्हणजे, टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजा दुखापतीमुळे या मालिकेत खेळू शकणार नाही. 

पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी जाहिर करण्यात आलेल्या 18 जणांच्या संघात रविंद्र जाडेजाचा समावेश नव्हता. पण त्यानंतरच्या दोन कसोटींसाठी त्याच्या नावाच विचार केला जाणार होता. पण आता बोटाला झालेली दुखापत बरी होण्यास सहा आठवडे लागणार आहेत. त्यामुळे त्याला या मालिकेत खेळता येणार नाही. ऑस्ट्रेलिया सोबतच्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली पितृत्वाच्या रजेसाठी मायदेशी परतला होता. मात्र त्यानंतर आता इंग्लंडविरुद्धच्या कसोटीतून विराट पुन्हा मैदानात उतरणार आहे. याशिवाय ईशांत शर्मा दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाऊ शकला नव्हता. पण त्यानंतर इशांतने सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत उतरत दर्जेदार कामगिरी केली आहे. आणि या पार्श्वभूमीवर इशांत शर्माने पुन्हा संघात प्रवेश केला आहे.  हार्दिक पांड्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-ट्वेन्टी मालिकेनंतर भारतात परतला होता. परंतु आता हार्दिक पांड्याही इंग्लंड बरोबरच्या कसोटी मालिकेत खेळणार आहे. 

भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, शुभमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, वृद्धिमान साहा, हार्दिक पांड्या, केएल राहुल, रिषभ पंत, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, आर अश्विन, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल     

कसोटी मालिका

  • 5 ते 9 फेब्रुवारी – पहिली कसोटी – चेन्नई
  • 13 ते 17 फेब्रुवारी – दुसरी कसोटी – चेन्नई
  • 24 ते 28 फेब्रुवारी – तिसरी कसोटी  – अहमदाबाद
  • 4 ते 8 मार्च – चौथी कसोटी – अहमदाबाद
No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com