ISL 2020: काही वेळातच पहिल्या सामन्याला सुरूवात; ऐतिहासिक क्षणांचे व्हा साक्षीदार

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2020

जीएमसीवर होणाऱ्या पहिल्या सामन्यात एटीके मोहन आणि केरला ब्लास्टर्स आमनेसामने असतील. लॉकडाउननंतर पहिल्यांदाच ही स्पर्धा होत असल्याने देशातील फूटबॉल चाहत्यांसाठी तसेच सबंध क्रीडा विश्वासाठी हा एक ऐतिहासिक क्षण असेल.  
 

पणजी- हिरो इंडियन सुपर लीगच्या सातव्या हंगामाला आजपासून सुरूवात होत आहे. कोरोनामुळे प्रदीर्घ काळ लॉकडाउन असल्याने देशातील सर्वच क्रीडा स्पर्धा झाल्याच नाहीत. जीएमसीवर होणाऱ्या पहिल्या सामन्यात एटीके मोहन आणि केरला ब्लास्टर्स आमनेसामने असतील.

लॉकडाउननंतर पहिल्यांदाच ही स्पर्धा होत असल्याने देशातील फूटबॉल चाहत्यांसाठी तसेच सबंध क्रीडा विश्वासाठी हा एक ऐतिहासिक क्षण असेल.  
 
सहाव्या हंगामाच्या अंतिम सामन्यावरही कोरोनाचे सावट होते. मात्र, कोरोना संसर्गाचे गांभीर्य लक्षात घेता हा सामना प्रेक्षकांशिवाय पार पडला होता. एटीके मोहन आणि चेन्नईयीन एफसी यांच्यात हा सामना पार पडला होता. त्यानंतर मात्र, गेले आठ महिन्यांपासून केवळ फुटबॉलच नाही तर कोणत्याही क्रीडा प्रकाराचा एकही सामना मैदानावर झाला नाही. आज या सामन्यामुळे भारतातील मैदाने पुन्हा एकदा प्रेक्षकांनी दणाणतील अशी आशा क्रीडा विश्वात वर्तवण्यात येत आहे.   

मागील आठ ते नऊ महिन्यांनंतर देशात भरणारी ही पहिलीच मोठी स्पर्धा आहे. प्रेक्षकांची उपस्थिती नसली तरी टेलीव्हीजन सेटवर लाईव्ह प्रक्षेपण बघता येणार आहे. देशातील कोरोना स्थिती पूर्ववत झाल्यावरच प्रेक्षकांना आता प्रत्यक्ष मैदानावर जाऊन सामना बघता येणार आहेत. मात्र, घरी बसून बघण्यासाठी यावेळी सामन्यांची संख्या वाढली आहे. मागीलवेळी ९५ सामने खेळवण्यात आले होते. यावेळी ती संख्या ११५वर गेली आहे. मागीलवेळी संघांची संख्या १० होती. यावेळी त्यात आणखी एका संघाची भऱ पडल्याने ईस्ट बंगाल एफसीला समाविष्ट केल्यावर ही संघांची एकूण संख्या आता 11 इतकी झाली आहे. 
 

संबंधित बातम्या