MI vs KKR: शाहरुख़ खान भडकाला; KKR च्या फॅन्सची मागितली माफी

दैनिक गोमंतक
बुधवार, 14 एप्रिल 2021

काल झालेल्या रोमांचकारी सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा मुंबई इंडियन्सने (एमआय विरुद्ध केकेआर) 10 धावांनी पराभव केला

काल झालेल्या रोमांचकारी सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा मुंबई इंडियन्सने (एमआय विरुद्ध केकेआर) 10 धावांनी पराभव केला. 15 व्या षटकापर्यंत  सामन्यात केकेआरचे पूर्णपणे वर्चस्व  होते. परंतु राहुल चहरने 4 बळी घेऊन केकेआर संघाला पराभवाच्या दारात नेले. त्यानंतर अखेरच्या काही षटकात  जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट  बोल्टने केलेल्या भेदक गोलंदाजीने मुंबईच्या पराभवाची बाजी विजयात बदलली. शेवटच्या षटकात केकेआरचा संघ 15 धावा करू शकला नाही त्यामुळे 10 धावांनी केकेआरला सामना गमावाव लागला.(Shah Rukh apologizes to KKR fans)

IPL 2021 SRH vs RCB: आज हैद्राबाद विरुद्ध बेंगलोर सामना; 'या' खेळाडूच...

सामन्यानंतर संघाचा मालक शाहरुख खानने ट्विट करुन केकेएच्या चाहत्यां समोर दिलगिरी व्यक्त केली आहे. मी एवढेच सांगू शकतो, अतिशय खराब कामगिरी, मी केकेएच्या चाहत्यांकडे दिलगिरी व्यक्त करतो. अशा पद्धतीने ट्वीट करत शाहरुख खानाने दिलगिरी व्यक्त केल आहे. शाहरुखचं हे ट्विट खूप व्हायरल होत आहे.

 

शेवटच्या पाच षटकांत केकेआरला विजयासाठी 31 धावांची गरज होती. सहा विकेट शिल्लक असताना मुंबईच्या गोलंदाजांनी सामना खेचून आणला. राहुल चहरने चार षटकांत 27 धावा देऊन चार गडी बाद केले तर चार षटकांत केवळ 13 धावा खर्च करून क्रुणाल पांड्याने एक विकेट घेतली. ट्रेंट बाउल्टनेही शेवटच्या षटकात शानदार गोलंदाजी केली आणि दोन गडी बाद केले. त्याने चार षटकांत 27 धावा दिल्या.

IPL च्या इतिहासातील सर्वात लहान 5 कर्णधार

आंद्रे रसेलने 4 षटकात पाच विकेट्स घेत मुंबई इंडियन्सला 20 षटकांत 152 धावांवर रोखले. नितीश राणा आणि शुभमन गिलने पहिल्या विकेटसाठी 72  धावांची भागीदारी केली असूनही केकेआरची टीम 20 षटकांत 142 धावा करू शकली. लक्ष्याचा पाठलाग करताना शुबमन गिल आणि नितीश राणा यांनी केकेआरला एक शानदार सुरुवात दिली आणि केकआर सहज सामना जिंकेल असे वाटत होते पण राहुल चहरच्या फिरकीने केकेआरला पराभवाच्या दारात पोहोचवले.

संबंधित बातम्या