IPL 2021: खेळाडूंचे नाव घेत शाहरुखने केले KKRचे अभिनंदन, मात्र मॉर्गनचा उल्लेख नाही...

IPL 2021: खेळाडूंचे नाव घेत शाहरुखने केले KKRचे अभिनंदन, मात्र मॉर्गनचा उल्लेख नाही...
shahruk.jpg

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) इतिहासात असे अनेक संघ आहेत ज्यांनी 100 किंवा अधिक सामने जिंकले आहेत. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज (सीएसके) नंतर कोलकाता नाईट रायडर्सची (केकेआर) संघ सुद्धा या विशेष गटात सामील झाला आहे. रविवारी आयपीएलच्या 14 व्या मोसमातील त्यांच्या पहिल्या सामन्यात केकेआरने सनरायझर्स हैदराबादचा 10 धावा करत जोरदार विजय मिळवला. या विजयानंतर संघाचे सह-मालक शाहरुख खान यांनी एक खास ट्विट केले. किंग खानच्या ट्विटमध्ये विजयाचे शिलेदार म्हणून आठ खेळाडूंचा उल्लेख केलेला पाहायला मिळाला, परंतु आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या आठ खेळाडूंमध्ये कॅप्टन इऑन मॉर्गनचा उल्लेख शाहरुख खानने केला नाही. (Shah Rukh congratulated KKR on the names of the players, but did not mention Morgan.)

 शाहरुखने ट्विटमध्ये केकेआर टीमचे अभिनंदन करताना लिहिले की, 'आयपीएलमध्ये 100 वा विजय नोंदवणे ही आनंदाची गोष्ट आहे. वेलडन  बॉईज ... केकेआर, नितीश राणा, दिनेश कार्तिक, प्रसिद्ध कृष्णा, राहुल, आंद्रे रसेल, हरभजन सिंग (त्याला थोडी गोलंदाजी करताना पाहून आनंद झाला.), साकिब अल हसन आणि पॅट कमिन्स सगळ्यांना खेळताना पाहून छान वाटले.' केकेआरकडून पहिला सामना खेळणार्‍या हरभजन सिंगला अवघ्या एका षटकात गोलंदाजीची संधी मिळाली होती, त्याचा देखील  शाहरुखच्या ट्विटमध्ये उल्लेख केलेला दिसतो आहे.

केकेआरने (KKR) चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 187 धावा केल्या. नितीशशिवाय राहुल त्रिपाठीने शानदार फलंदाजी करत 23 balls चेंडूंत 53 धावा केल्या आणि दिनेश कार्तिकने 9 चेंडूंत नाबाद 22 धावा केल्या. प्रत्युत्तरामध्ये सनरायझर्स हैदराबाद संघ २० षटकांत पाच विकेटसाठी 177 धावा करू शकला. मनीष पांडेने मनीष पांडे 44 चेंडूत  ६१ धावा करून शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकला, परंतु संघ जिंकू शकला नाही. या विजयासह केकेआर पॉइंट्स टेबलमध्ये (Point Table) दुसर्‍या स्थानावर पोहोचला आहे.तर सध्या पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर दिल्ली कॅपिटलस (Delhi Capitals) संघ आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com