अंपायरने टोपी पकडण्यास नकार दिल्यामुळे शाहिद अफ्रिदी ICC वर नाराज

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 25 फेब्रुवारी 2021

सध्या जगभरात कोरोनाची लाट असल्याने, क्रिकेट सामन्यादरम्यान पंचांना खेळाडूची टोपी न घेण्याच्या सूचना ICC कडून  (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) देण्यात आल्या आहेत.

कराची :  सध्या जगभरात कोरोनाची लाट असल्याने, क्रिकेट सामन्यादरम्यान पंचांना खेळाडूची टोपी न घेण्याच्या सूचना ICC कडून  (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) देण्यात आल्या आहेत. परंतु, या निर्णयावर शाहीद अफ्रिदी चांगलाच नाराज झाला आहे. पाकिस्तान सुपर लीगमध्ये (पीएसएल) मुल्तान सुल्तान या संघाकडून खेळत असलेल्या आफ्रिदीने पेशावर झल्मीविरुद्धच्या सामन्यात त्याच्या गोलंदाजीदरम्यान पंचांना टोपी पकडण्यास दिली, त्यावेळी त्यांनी अफ्रिदीची टोपी पकडण्यास नकार दिला. या घडनेमुळे शाहीद अफ्रिदी ICC च्या नियमांवर भलताच नाराज झाला आहे. 

विरेंद्र सेहवाग म्हणतो..रिषभ पंत हाच 'अल्टिमेट स्ट्रिट क्रिकेटर'

शाहिद आफ्रिदीने बुधवारी ट्विट करत, "प्रिय आयसीसी, जेव्हा पंच, खेळाडू, व्यवस्थापन हे सगळे सेफ बायो बबल वातावरणात आहेत. जर खेळाडू सामन्याच्या शेवटी हॅंडशेक करू शकतात, तर पंच गोलंदाजाची टोपी का पकडू शकत नाही?"असा खोचक सवाल शाहिद अफ्रिदीने ICC विचारला आहे.  1 मार्च 1975 रोजी जन्मलेला शाहिद आफ्रिदी हा पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार होता. त्याने 27 कसोटी सामने खेळले ज्यामध्ये 36.51 च्या सरासरीने त्याने 1716 धावा केल्या. त्याचबरोबर त्याने 398 एकदिवसीय सामन्यात 23.58 च्या सरासरीने 8064 धावा केल्या. याव्यतिरिक्त, 99 टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याने 17.92 च्या सरासरीने 1416 धावा केल्या. त्याने तीनही स्वरूपात अनुक्रमे, 48, 55 व  98 विकेट्स घेतल्या आहेत.

चाहत्याने ऐन सामन्यादरम्यान घेतली विराट कोहलीकडे धाव; रिअ‍ॅक्शन बघून जावं लागलं परत

शाहिद आफ्रिदीने अनेक वेळा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्याने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 2018 मध्ये वेस्ट इंडीज विरूद्ध खेळला होता. हा टी -20 सामना होता. 1988 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा आफ्रिदी 2006 मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाला होता. पण 2010 मध्ये तो पुन्हा कसोटी संघात परतला आणि तोही कर्णधार म्हणून. 2011 वनडे विश्वचषकानंतरही त्याने निवृत्तीची घोषणा केली होती पण काही महिन्यांतच तो संघात परतला. यानंतर त्याने 2015 मध्ये वर्ल्ड कप आणि 2016 मध्ये टी -20 वर्ल्ड कप देखील खेळला.

संबंधित बातम्या