'यॉर्कर टाकण्याची अक्कल नाही', शाहिद आफ्रिदीने जावयाला सुनावले खडे बोल!

पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने (Shahid Afridi) या पराभवासाठी हसन अलीला दोषी न मानता त्याने आपल्या जावायला दोषी ठरवले आहे.
'यॉर्कर टाकण्याची अक्कल नाही', शाहिद आफ्रिदीने जावयाला सुनावले खडे बोल!
Shaheen AfridiDainik Gomantak

टी-20 विश्वचषकामधील (T20 World Cup) पाकिस्तानचा पराभव पाकिस्तानी चाहत्यांच्या चांगलांच जिव्हारी लागला आहे. भारत (India) आणि न्यूझीलंडसारख्या (New Zealand) संघांना एकतर्फी पराभूत करणारा पाकिस्तानी संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात होता. मात्र, ऑस्ट्रेलियाने (Australia) पाकिस्तानचा पराभव करुन अंतिम फेरीत जाण्याच्या त्यांच्या आशा संपुष्टात आणल्या. या सामन्यानंतर पाकिस्तानी चाहत्यांनी हसन अलीला (Hassan Ali) ट्रोल केले. ज्याने ऑस्ट्रेलियन फलंदाज मॅथ्यू वेडचा (Matthew Wade) महत्त्वाचा झेल सोडला होता. अन् त्यानंतर पाकिस्तानला पराभवाची चव चाखावी लागली. चाहत्यांनी या पराभवासाठी चाहत्यांनी हसन अलीला (Hasan Ali) जबाबदार धरले.

दुसरीकडे मात्र, पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने (Shahid Afridi) या पराभवासाठी हसन अलीला दोषी न मानता त्याने आपल्या जावायला दोषी ठरवले आहे. या सामन्यात पाकिस्तान मजबूत स्थितीत होता. त्याने 100 धावापूर्वीच ऑस्ट्रेलियाच्या 5 विकेट घेतल्या होत्या. मात्र, त्यानंतर मॅथ्यू वेडच्या शानदार फलंदाजीने पाकिस्तानच्या हातून ऑस्ट्रेलियाने विजय हिरावून घेतला. सामन्याच्या महत्त्वपूर्ण 19 व्या षटकात हसन अलीने वेडचा झेल सोडला, त्यानंतर वेडने पुढच्या तीन चेंडूंवर तीन षटकार मारत संघाला विजय मिळवून दिला.

Shaheen Afridi
T20 World Cup: 'संघ निवडीत माझा अन् कोहलीचा समावेश नव्हता'

शाहिद आफ्रिदीने शाहीनला पराभवाचे कारण सांगितले

हसन अलीने झेल सोडल्यामुळे पाकिस्तान हरला नाही, या पराभवाला त्याचा जावाई अर्थात शाहीन आफ्रिदीची खराब गोलंदाजी कारणीभूत आहे, असे शाहिद आफ्रिदी निरिक्षण नोंदवले आहे. शाहिद आफ्रिदी म्हणाला, 'मी शाहीनवर खूश नाही. हसन अलीने झेल सोडला याचा अर्थ असा नाही की, तुम्ही सलग 3 षटकार माराल. शाहीनचा वेग खूप आहे आणि त्याला बाहेर यॉर्कर टाकता यायला हवे होते. पण त्याने वेडच्या आवडत्या क्षेत्रात गोलंदाजी केली.'' शाहिद आफ्रिदीने आपली मुलगी अक्षाचे शाहीनसोबत विवाह निश्चित केला आहे. आफ्रिदीला पाच मुली आहेत. अक्ष 20 वर्षांची आहे आणि ती स्टेडियममध्ये तिच्या वडिलांसोबत टी-20 वर्ल्ड कपमध्ये मॅच पाहताना दिसली होती.

शाहीन आफ्रिदीने संपूर्ण स्पर्धेत चांगली गोलंदाजी केली

शाहीन शाह आफ्रिदीने भारताविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुलला बाद करुन पाकिस्तानच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. शाहीनने भारताविरुद्ध तीन विकेट घेतल्या आणि विश्वचषकात प्रथमच पाकिस्तानने भारताविरुद्ध विजय मिळवला. सुपर 12 मध्ये शाहीनने शानदार गोलंदाजी केली मात्र सेमीफायनलमधील महागड्या ओव्हरने तो चाहत्यांचा शत्रू बनला आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com