पाकिस्तानच्या संघात स्थान मिळवणे इतके सोपे आहे? आफ्रिदीचा क्रिकेट बोर्डाला सवाल

मोहम्मद हरिसच्या संघातील निवडीवर प्रश्न उपस्थित होत असून लोक पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर जोरदार टीका करत आहेत.
पाकिस्तानच्या संघात स्थान मिळवणे इतके सोपे आहे? आफ्रिदीचा क्रिकेट बोर्डाला सवाल
Shahid Afridi Dainik Gomantak

पाकिस्तानने वेस्ट इंडिजविरुद्धची तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका 3-0 ने जिंकली. बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघाने मुलतानमध्ये खेळल्या गेलेल्या तिन्ही सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केली. कर्णधार बाबरने स्वतः संघाचे नेतृत्व करत तीन सामन्यांत एक शतक आणि एक अर्धशतक झळकावले. मात्र, या विजयानंतरही पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने आपल्याच संघावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

Shahid Afridi
पेनया यांच्यासमवेत खेळल्याचा फायदाच! सेरिटन फर्नांडिस यांचे मत

मोहम्मद हरिसच्या संघातील निवडीवर प्रश्न उपस्थित होत असून लोक पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर जोरदार टीका करत आहेत. या तरुण पाकिस्तानी खेळाडूने वेस्ट इंडिजविरुद्ध पदार्पण केले आणि तिन्ही सामन्यांमध्ये तो संघाचा भाग होता. पहिल्या एकदिवसीय सामन्यात हरिसला फलंदाजीची संधी मिळाली नाही, तर उर्वरित दोन सामन्यांमध्ये तो अपयशी ठरला. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात हरिस सहा धावांवर तर तिसऱ्या वनडेत शून्यावर बाद झाला.

Shahid Afridi
यशस्वी जैस्वालने 50 चेंडूंनंतर खाते उघडताच, पृथ्वी शॉ ने शेअर मजेदार मिम्स

मालिका संपल्यानंतर पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी हारिसवर टीका करणारा पहिला खेळाडू ठरला. हा निर्णय मूर्खपणाचा असल्याचे सांगत आफ्रिदीने पीसीबीला प्रश्न विचारला की पाकिस्तान संघात स्थान मिळवणे इतके सोपे आहे का? आफ्रिदी म्हणाला- हा मूर्खपणाचा निर्णय होता. मी हे रमीझ राजाला सांगणार नाही, पण मोहम्मद वसीम ऐकत असेल तर मी त्याला असे पाऊल उचलू नका असे सांगेन.

आफ्रिदीने युवा खेळाडूंना संधी देण्याचे समर्थन केले. आफ्रिदी म्हणाला, "तरुण खेळाडूंच्या समावेशाला माझा पाठिंबा आहे, पण किमान त्यांना देशांतर्गत क्रिकेट खेळू द्या. तुमच्याकडे सरफराज आणि रिझवानही आहेत."

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com