शाहीद आफ्रिदी दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डावर भडकला; जाणून घ्या

शाहीद आफ्रिदी दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डावर भडकला; जाणून घ्या
Shahid Afridi lashes out at South African cricket board Find out

इंडियन प्रिमिअर लिगच्या (आयपीएल) 14  व्या हंगामाची सुरुवात उद्यापासून होत आहे. त्यापूर्वी पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदी दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डावर चांगलाच संतापला आहे. त्याने सीएसएवर जोरदार निशाणा साधला आहे.  सीएसएने पाकिस्ताननिरोधात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरु असताना आपल्या काही स्टार क्रिकेटपटूंना आयपीएलमध्ये सहभागी होण्याची परवानगी दिली आहे. यावरुन आफ्रिदीने दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डावर निशाणा साधला.

यजमान दक्षिण आफ्रिकेचा संघ पाकिस्तानविरुध्दच्या तिसऱ्या सामन्यामध्ये यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डि कॉक आणि वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा यांच्या अनुपस्थित उतरला होता. तिसरा सामना 28 धावांनी जिंकून पाकिस्तानने तीन एकदिवसीय मालिका 2-1 अशा फरकाने जिकंली. पाकिस्तानने दिलेल्या 321 धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेचा संघ 3 चेंडू शिल्लक असताना  229 धावांवर सर्वबाद झाले. तिसरा सामना संपल्यानंतर शाहीद आफ्रिदीने सोशल मिडियावरील ट्विटरद्वारे आपली संतप्त प्रतिक्रिया दिली. (Shahid Afridi lashes out at South African cricket board Find out)

आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर टी-ट्वेन्टी लीगचा परिणाम होतो हे पाहून अत्यंत वाईट वाटते. दक्षिण आफ्रिकेने एकदिवसीय मालिका अर्धवट सोडून खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी दिली याचं खूप आश्चर्य वाटतं आहे... याबाबत पुन्हा एकदा जरुर विचार करण्याची गरज आहे अशा शब्दामध्ये आफ्रिदीने  दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाला धारेवर धरलं.

दरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिका पाकिस्तानने 2-1 अशा फरकाने आपल्या खिशात घातली. आता 10 एप्रिलपासून दोन्ही संघामध्ये चार सामन्यांच्या टी-टवेन्टी मालिकेला सुरुवात होणार आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com