Rahul Dravid: 'द वॉल'चा साधेपणा पुन्हा समोर! पाकिस्तानी क्रिकेटरने सांगितला मन जिंकणारा किस्सा

पाकिस्तानी युवा क्रिकेटपटूने द्रविडबद्दलचा एक मन जिंकणारा किस्सा शेअर केला आहे.
Shahnawaz Dahani shared an interesting anecdote when he met Dravid
Shahnawaz Dahani shared an interesting anecdote when he met DravidDainik Gomantak

Rahul Dravid: भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड हा सभ्य व्यक्ती म्हणून ओळखला जातो. खेळाडू म्हणून त्याच्या कारकिर्दीतही तो त्याच्या शांत स्वभावामुळे म्हणून लोकप्रिय होता. दरम्यान त्याचा साधेपणा पुन्हा एका 24 वर्षीय पाकिस्तानी खेळाडूने सर्वांसमोर आणला आहे.

द्रविडने बुधवारी (11 जानेवारी) त्याचा 50 वा वाढदिवस साजरा केला. तो त्याच्या 50 व्या वाढदिवसाला भारतीय संघाबरोबर होता. सध्या भारताची श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिका सुरू आहे. दरम्यान, त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याला जगभरातील अनेक आजी-माजी खेळाडूंनी सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या.

Shahnawaz Dahani shared an interesting anecdote when he met Dravid
Rahul Dravid: वर्षाला 10 कोटी मोबदला घेणाऱ्या राहुल द्रविडचे प्रशिक्षकपद धोक्यात?

द्रविडला पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहनवाज दहानीनेही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्याने गेल्यावर्षी ऑस्ट्रेलियामध्ये टी20 वर्ल्डकपदरम्यान द्रविडच्या भेटीवेळीचा फोटो शेअर करताना त्यावेळीच्या एका घटनेचा किस्सा देखील सर्वांबरोबर शेअर केला.

दहानीने लिहिले की 'सर्वात सभ्य खेळाडूला वाढदिवसाच्या शुभेच्छा. या फोटोंमागील गोष्ट अशी की मी वर्ल्डकपदरम्यान ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन शहरात एका रेस्टॉरंटमध्ये माझ्या मित्रांबरोबर जेवण करत होतो. त्यावेळी राहुल द्रविड सर देखील त्याच रेस्टॉरंटमध्ये आले.'

'तिथे त्यांनी मला पाहिले. तेव्हा ते त्यांच्या जागेवर जाण्याआधी मला आणि माझ्या मित्रांना खूप प्रेमपूर्वक आणि आदरपूर्वक भेटले. आम्ही सर्वांनी त्यांच्याबरोबर फोटो काढले. फक्त कल्पना करा तुमच्या प्रतिस्पर्धी संघाचा प्रशिक्षक, क्रिकेटची वॉल, राहुल द्रविड सर तुम्हाला आणि तुमच्या मित्रांना येऊन भेटतात. त्यादिवशी मी एक धडा शिकलो की नम्रता ही यशाची गुरुकिल्ली आहे.'

(Shahnawaz Dahani shared an interesting anecdote when he met Dravid)

दहानीने शेअर केलेल्या या घटनेवर अनेकांनी प्रतिक्रिया दिली असून अनेक चाहत्यांनी द्रविडचे कौतुकही केले आहे.

द्रविडने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 164 कसोटी, 344 वनडे आणि 1 टी20 सामना खेळला आहे. त्याने कसोटीमध्ये 36 शतके आणि 63 अर्धशतकांसह 13288 धावा केल्या आहेत. तसेच वनडेमध्ये 12 शतके आणि 83 अर्धशतकांसह 19889 धावा केल्या आहेत.

त्याचबरोबर त्याने एका टी20 सामन्यात 31 धावा केल्या आहेत. तो 2012 मध्ये अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. त्यानंतर त्याने 19 वर्षांखालील भारतीय संघ, भारतीय अ संघ यांचेही प्रशिक्षकपद सांभाळले. त्याचबरोबर काही काळ तो बंगळुरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुखही होता. त्यानंतर त्याला भारतीय वरिष्ठ संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्त करण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com