IPL Auction: तब्बल 2 वर्षांनंतर 'या' बंगाली टायगरची IPL एन्ट्री, KKR चा मोठा निर्णय

IPL 2023 Auction: कोलकाता नाईट रायडर्सने गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली 2012 आणि 2014 मध्ये आयपीएल ट्रॉफी जिंकली होती.
IPL Auction
IPL AuctionDainik Gomantak

IPL 2023 Auction: कोलकाता नाईट रायडर्सने गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली 2012 आणि 2014 मध्ये आयपीएल ट्रॉफी जिंकली होती. मात्र यानंतर संघाला म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही. आयपीएल 2022 मध्ये, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली, संघ प्लेऑफसाठीही पात्र ठरु शकला नाही. पण आता KKR संघाने IPL 2023 च्या लिलावात ट्रॉफी जिंकण्यासाठी मोठा सट्टा लावला आहे. त्यांच्या संघात एक स्टार खेळाडू परत आला आहे. चला तर मग जाणून घेऊया या खेळाडूबद्दल...

केकेआरने हा सट्टा लावला

आयपीएल 2023 च्या लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने बांगलादेशचा कर्णधार शकीब अल हसनला विकत घेतले. शाकिब यापूर्वी केकेआर संघाकडूनही खेळला आहे. त्याच्याकडे अफाट अनुभव आहे, जो संघासाठी उपयुक्त ठरु शकतो. IPL 2022 च्या मेगा लिलावात शाकिबला कोणीही विकत घेतले नव्हते. यावेळी त्याची बे प्राइस दीड कोटी रुपये होती, त्याच किमतीत केकेआरने त्याचा संघात समावेश केला.

IPL Auction
IPL Auction: मुलासाठी बापाने सोडली नोकरी, आता कॅप्टन कूलच्या नेतृत्वाखाली खेळणार 'हा' क्रिकेटर

केकेआरने अनेक सामने जिंकले

शाकिब अल हसनची (Shakib Al Hasan) गणना जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंमध्ये केली जाते. तो एक असा खेळाडू आहे, जो किलर बॉलिंग आणि डॅशिंग बॅटिंगमध्ये पारंगत आहे. भारतीय खेळपट्ट्या नेहमीच फिरकीपटूंसाठी उपयुक्त ठरल्या आहेत. विशेष म्हणजे, त्याने आयपीएलच्या 71 सामन्यांमध्ये आपल्या बॅटने 793 धावा केल्या आहेत, ज्यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर त्याने बॉलसह 63 विकेट्स घेतल्या आहेत. तो T20 क्रिकेटचा महान मास्टर मानला जातो. शाकिब केकेआर संघात सामील होताच त्याची फलंदाजी आणि गोलंदाजी मजबूत होईल.

IPL Auction
IPL Auction 2023: सीएसकेने 16.25 कोटींची बोली लावताच बेन स्टोक्सची 'अशी' होती पहिली रिऍक्शन

लिटन दासचेही चांगल्या फॉर्ममध्ये

बांगलादेशच्या (Bangladesh) लिटन दासलाही KKR संघाने 50 लाखांच्या मूळ किमतीत विकत घेतले आहे. लिटन अतिशय चांगल्या फॉर्ममध्ये असून तो विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com