'जसप्रीत बुमराह जगातील सर्वश्रेष्ठ टी-ट्वेन्टी गोलंदाज'; बघा कोण म्हणतंय..

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2020

एकेकाळचा जगातील सर्वोत्तम गोलंदाज शेन बाँडने त्याचे भरभरून कौतूक करताना बुमराह जगातील सर्वोत्तम टी ट्वेन्टी गोलंदाज असल्याचे मत व्यक्त केले आहे.

दुबई- आयपीएलचा यंदाचा हंगाम संपत आला आहे. प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही मुंबई इंडियन्सने अंतिम सामन्यासाठी आपली जागा निश्चित केली आहे. दिल्लीच्या दांड्या गुल करत त्यांनी काल हा पराक्रम साधला आहे. या सामन्यात आणि या हंगामात त्यांना जसप्रीत बुमराहने एकहाती सामने जिंकून दिले. त्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी करताना विरोधी संघांना सावरायलाही वेळ दिला नाही. सर्वाधिक बळी मिळवणाऱ्या गोलंदाजांना दिली जाणारी पर्पल कॅप पटकावत त्याने आपला दर्जा सिद्ध केला आहे. मात्र, यापेक्षाही महत्वाची गोष्ट म्हणजे एकेकाळचा जगातील सर्वोत्तम गोलंदाज शेन बाँडने त्याचे भरभरून कौतूक करताना बुमराह जगातील सर्वोत्तम टी ट्वेन्टी गोलंदाज असल्याचे मत व्यक्त केले आहे.

  न्युझीलंडचा माजी खेळाडू आणि मुंबई इंडियन्सचा गोलंदाजी प्रशिक्षक शेन बॉन्डने बुमराहला गोलंदाजी करताना बघणे म्हणजे एक विशेष गोष्ट असल्याचे म्हटले आहे. जसप्रीत हा जगातील सर्वोत्तम गोलंदाज असल्याचे मत मुंबई इंडियन्सने प्रसिद्ध केलेल्या एका व्हिडीओतशेन बॉन्ड व्यक्त केले आहे. 

जसप्रीत बुमराह मागील ५ हंगामापासून मुंबई इंडियन्सचा एक अविभाज्य भाग आहे. तसेच भारतीय संघातीलही सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक असलेला बुमराह क्रिकेटच्या तीनही प्रकारातील गोलंदाज म्हणून तयार झाला आहे. आयपीएल सारख्या मोठ्या स्पर्धेतून आपल्या गोलंदाजीला सुरूवात करणाऱ्या बुमराहला त्याच्या मुंबई इंडियन्स मुंबई इंडियन्स संघातीलच अनुभवी गोलंदाज लसीथ मलिंगा याचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्यामुळे लसीथ मलिंगाच्या निवृत्तीनंतर आता बुमराहला यॉर्कर किंग ही उपाधी तमाम क्रिकेट रसिकांकडून मिळते.

संबंधित बातम्या