Ravindra Jadeja & Shikhar Dhawan
Ravindra Jadeja & Shikhar DhawanDainik Gomantak

Shikhar Dhawan: 'याचं लग्न करा रे...,'गब्बरने डान्स करताच जड्डूने दिला हा सल्ला

Ravindra Jadeja: भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला दुखापतीमुळे टी-20 विश्वचषक 2022 मध्ये स्थान मिळालेले नाही.

Ravindra Jadeja On Shikhar Dhawan: भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला दुखापतीमुळे टी-20 विश्वचषक 2022 मध्ये स्थान मिळालेले नाही. त्याचवेळी सलामीवीर शिखर धवनही टीम इंडियाच्या टी-20 संघातून बाहेर पडत आहे. आता या दोन्ही स्टार खेळाडूंचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रवींद्र जडेजाने धवनच्या लग्नाची चर्चा केली आहे.

Ravindra Jadeja & Shikhar Dhawan
T20 क्रिकेटमध्ये 1000 चौकार मारणारा शिखर धवन पहिला भारतीय फलंदाज

हा सल्ला रवींद्र जडेजाने दिला

भारताचा स्टार सलामीवीर शिखर धवनने (Shikhar Dhawan) त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) स्ट्रेचरवर बसलेला दिसत आहे आणि त्याच्या गुडघ्याला पट्टी बांधलेली आहे. शिखर धवन जेव्हा पुन्हा-पुन्हा नाचून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतो. रवींद्र जडेजा रागाने म्हणतो की,'याचं लग्न करा, जबाबदारी आली तर सुधारेल.' जडेजाने 1981 मध्ये आलेल्या बुलंदी चित्रपटातील डायलॉग कथन केला आहे.

शिखर धवनने दिले उत्तर

व्हिडिओ शेअर केल्यानंतर शिखर धवनने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'नाही-नाही, आता नाही, थोडे थांबा.' धवन सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे, त्याने शेअर केलेले फोटो चाहत्यांना खूप आवडतात. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (South Africa) वनडे मालिकेत शिखर धवन टीम इंडियाचा भाग असू शकतो. तो कर्णधारपदही सांभाळू शकतो, असे मानले जात आहे.

Ravindra Jadeja & Shikhar Dhawan
Ind WI: धवन सोबत ओपनिंग कोण करणार? शुक्रवारपासून वेस्ट इंडीज विरूद्ध वनडे मालिका

आयशा मुखर्जीशी लग्न केले

शिखर धवनने 2012 मध्ये त्याच्यापेक्षा 10 वर्षांनी मोठ्या असलेल्या आयशा मुखर्जीशी लग्न केले, दोघांनाही जोरावर नावाचा मुलगा आहे. आयशा आधीच घटस्फोटित होती, परंतु धवनसोबतचे तिचे नाते फार काळ टिकले नाही आणि 2021 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. आयशा मुखर्जीला पहिल्या लग्नापासून दोन मुली आहेत, ज्यांची नावे लिया आणि रिया आहेत.

Ravindra Jadeja & Shikhar Dhawan
टिम इंडीया कोरोनाच्या विळख्यात; धवन, अय्यर, गायकवाड विलगिकरणात

धवन-जडेजा दोघेही बाहेर

T20 विश्वचषक 2022 मध्ये शिखर धवन आणि रवींद्र जडेजा या दोघांनाही स्थान मिळालेले नाही. परंतु या दोन्ही खेळाडूंनी भारतीय संघासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्हीत रवींद्र जडेजा भारतासाठी हिट ठरतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com