सल्लूभाईच्या स्टाईलमध्ये दिसला विराट कोहली; शर्टलेस फोटोज Viral

आयपीएल स्पर्धेनंतर सुट्टी मिळालेला विराट पत्नी अनुष्का शर्मासोबत सुट्टीचा आनंद घेताना दिसत आहे.
सल्लूभाईच्या स्टाईलमध्ये दिसला विराट कोहली; शर्टलेस फोटोज Viral
Virat KohliDainik Gomantak

टीम इंडियाचा माजी कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) सध्या सुट्टीवर आहे. आयपीएल स्पर्धेनंतर सुट्टी मिळालेला विराट पत्नी अनुष्का शर्मासोबत (Anushka Sharma) सुट्टीचा आनंद घेताना दिसत आहे. अनुष्काने त्या दोघांचा समुद्र किनाऱ्यावरील एक फोटो सोशल मीडियवर शेअर केला होता. त्यानंतर आता विराटनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला. (Shirtless photos of Virat Kohli on the beach are going viral)

Virat Kohli
Imam-ul-Haq ने केला मोठा विक्रम; असं करणारा तो जगातील दुसरा फलंदाज ठरला

विराट कोहलीनं बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) स्टाईलनं शर्टलेस फोटो शेअर केला. त्या फोटोमध्ये तो समुद्र किनाऱ्यावर बसलेला असून त्याच्या बॉडीवरील टॅटू देखील दिसून येत आहे. टीम इंडियातील सर्वात फिट खेळाडू असलेल्या विराटचा हा शर्टलेस फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे.

विराट कोहलीला आयपीएल 2022 नंतर 20 दिवसांचा ब्रेक मिळालेला आहे. यानंतर तो जुलै महिन्यात इंग्लंडमध्ये टेस्ट आणि लिमिटेड ओव्हरची सीरिज खेळताना दिसणार आहे. टीम इंडिया 15 जूनला इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होईल. कोहलीसह कर्णधार रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांनाही दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 सीरिजमधून विश्रांती देण्यात आली. इंग्लंड दौऱ्यात टीम इंडिया एक टेस्ट, तीन वन-डे आणि तीन टी20 सामने खेळणार आहे.

Virat Kohli
Ind vs Sa: भारताचा सलग दुसरा पराभव, दक्षिण आफ्रिकेने 4 विकेटने जिंकला सामना

विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) चकदा एक्सप्रेस या चित्रपटात दिसून येणार आहे, पण त्याआधी तिनेही छोटासा ब्रेक घेतला. या चित्रपटामध्ये अनुष्का भारतीय महिला क्रिकेट टीमची अनुभवी फास्ट बॉलर झुलन गोस्वामीच्या भूमिकेत दिसणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com