IPL 2021: शोएब अख्तर म्हणतो....

दैनिक गोमंतक
सोमवार, 26 एप्रिल 2021

आयपीएल संपल्यानंतर म्हणजेच 1 जुन पासून पीएसएल स्पर्धा पुन्हा सुरु होणार आहे.

कोरोनाच वाढत संकट लक्षात घेता इंडियन प्रीमियर लीग आणि पाकिस्तान प्रीमियर लीग पुढे ढकलण्याचा सल्ला पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने दिल आहे. 9 एप्रिल पासून यंदाच्या आयपीएल हंगामाला सुरुवात झाली, आतपर्यंत 20 सामने खेळालवाले गेले आहेत. परंतू कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता आयपीलच्या आयोजकांनी विचार करावा असं मत शोएबने व्यक्त केले आहे. पाकिस्तान प्रीमियर लीग फेब्रुवारी महिन्यात सुरु झाली होती. परंतू काही संघातील खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती. (Shoaib Akhtar says ....)

IPL 2021: ''जॉनी बेअयस्टो शौचालयात होता का''?

आयपीएल संपल्यानंतर म्हणजेच 1 जुन पासून पीएसएल स्पर्धा पुन्हा सुरु होणार आहे. क्रिकेट स्पर्धेपेक्षा लोकांचे जीव वाचणं महत्वाचे आहे असे शोएब म्हणाला. पुढे तो म्हणाला क्रिकेटवरती खर्च होणार पैसे कोरोनावरती वापरण्यात आला तर मोठी मदत होईल. भारत सध्या कोरोनाच्या भयानक संकटांना समोर जातोय. कठोर नियमांचं पालन करणं जमत नसेल तर, तर स्पर्धा पुढे ढकलण्याचा विचार करावा असे शोएबने मत व्यक्त केले. पाकिस्तान प्रीमियर लीग पुढे ढकललीये म्हणून मी आयपीएल पुढे ढकला असं मी म्हणत नाहीये. जूनमधील पीएसएल पण आणखी पुढे ढकला असे मत शोएबने व्यक्त केले आहे. 

आयपीएलवरती खर्च होणार पैसा ऑक्सिजन टॅंक खरेदी करण्यासाठी वापरण्यात येईल, त्यामुळे अनेकांचे जीव वाचतील. सध्या आपल्यला क्रिकेटचे हिरो किंवा मनोरंजनाची गरज नाही. सध्या आपल्यला भारतीय आणि पाकिस्तानी नागरिकांचे जीव वाचवणं जास्त महत्वाचं असल्याचं मत शोएब अख्तरने व्यक्त केले. पुढे तो म्हणाला रोज मृत्यूचे आकडे वाढत आहेत म्हणून मी कठोर विधान करतोय. भारताप्रमाणे पाकिस्तानही भयानक संकटातून जातोय पाकिस्तानमध्ये आताच्या घडीला १० टक्के ऑक्सिजन शिल्लक असल्याचे शोएब म्हणाला. सरकारने कडक लॉकडाऊन लावणे गरजेचे आहे लोक सध्या नियमांचे पालन करताना दिसत नाही. असे पुढे शोएब म्हणाला.   

संबंधित बातम्या