एफसी गोवाच्या एदू बेदियास कारणे दाखवा नोटीस; दुसऱ्यांदा निलंबित

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 16 फेब्रुवारी 2021

मैदानावरील अखिलाडूवृत्तीबद्दल एफसी गोवाचा कर्णधार एदू बेदिया याला अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या शिस्तपालन समितीने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

पणजी : मैदानावरील अखिलाडूवृत्तीबद्दल एफसी गोवाचा कर्णधार एदू बेदिया याला अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या शिस्तपालन समितीने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. याशिवाय, मोसमात चौथ्यांदा यलो कार्ड मिळाल्याने स्पॅनिश खेळाडू ओडिशा एफसीविरुद्धच्या सामन्यास निलंबित असेल.

टीम इंडियाचं दमदार कमबॅक; इंग्लंडला 317 धावांनी दिली मात

बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर गेल्या शनिवारी (ता. 13) सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत चेन्नईयीन एफसीविरुद्ध एफसी गोवाचा सामना झाला होता. त्याच्या लढतीच्या इंज्युरी टाईममध्ये बेदिया प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू दीपक टांग्री याच्याशी अखिलाडूवृतीने वागल्याचे नोंद झाली आहे. या प्रकरणी शिस्तपालन समितीने बेदियास बुधवारपर्यंत (ता. 17) उत्तर देण्यास सांगितले आहे.

IND Vs ENG : अम्पायरच्या 'त्या' निर्णयामुळे विराट कोहलीचा पारा चढला

दुसऱ्यांदा निलंबित

एफसी गोवाचा पुढील सामना ओडिशा एफसीविरुद्ध बुधवारी (ता. 17) फातोर्डा येथे खेळला जाईल. त्या लढतीत मोसमात चौथ्यांदा ताकीद मिळाल्याने निलंबित असलेला बेदिया खेळू शकणार नाही. यापूर्वी एफसी गोवाच्या कर्णधारास ईस्ट बंगालविरुद्धच्या लढतीत दोन यलो कार्डमुळे रेड कार्ड मिळाले होते, त्यामुळे निलंबन झाल्यामुळे तो नॉर्थईस्ट युनायटेडविरुद्धचा सामना खेळू शकला नव्हता. स्पर्धेतील 17 सामन्यानंतर 24 गुण असलेला एफसी गोवा संघ गुणतक्त्यात चौथ्या क्रमांकावर असून प्ले-ऑफ फेरीसाठी दावेदार आहे.
 

संबंधित बातम्या