Ind Vs Zim: दिग्गजांना मागे टाकत शुभमन गिलने बनवला खास 'रेकार्ड'

Shubman Gill: टीम इंडियाचा विस्फोटक फलंदाज शुभमन गिल सध्या शानदार फॉर्ममध्ये दिसत आहे.
Shubman Gill
Shubman Gill Dainik Gomantak

Ind Vs Zim: टीम इडियाचा विस्फोटक फलंदाज शुभमन गिल सध्या शानदार फॉर्ममध्ये दिसत आहे. झिम्बाब्वेविरुद्ध सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेत सर्वाधिक धावा केल्याबद्दल त्याला 'प्लेअर ऑफ द सिरीजचा' किताब देण्यात आला आहे. तर झिम्बाब्वेविरुद्ध जेतेपद मिळवण्यापासून तो आता अवघे काही तास दूर आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने शानदार शतक झळकावले. यासह त्याने एक मोठा विक्रमही आपल्या नावावर केला.

दरम्यान, शुभमन गिल हा पहिल्या नऊ डावात वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी (India) सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. या फॉरमॅटमध्ये गिलने श्रेयस अय्यरला मागे टाकले आहे. गिलने 9 एकदिवसीय सामन्यांमध्ये पदार्पण केल्यापासून 9 डावात 499 धावा केल्या आहेत. त्याच्या आधी हा विक्रम श्रेयस अय्यरच्या नावावर होता, ज्याने पहिल्या 9 डावात 469 धावा केल्या होत्या. श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) नवज्योत सिंग सिद्धू (417) आणि शिखर धवन (Shikhar Dhawan) (401) यांचा विक्रम मोडला होता.

Shubman Gill
ZIM vs IND ODI: भारताचे झिम्बाब्वे विरोधातील मालिकेवर वर्चेस्व

एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 9 डावांनंतर भारतासाठी सर्वाधिक धावा

  • 499 धावा - शुभमन गिल

  • 469 धावा - श्रेयस अय्यर

  • 417 धावा - नवज्योत सिद्धू

  • 401 धावा - शिखर धवन

Shubman Gill
IND vs ZIM: राष्ट्रगीतादरम्यान इशान किशनवर मधमाशीचा हल्ला- Video Viral

याशिवाय, शुभमन गिल हा ओव्हरसीज इंडियासाठी सर्वात तरुण शतक झळकावणारा तिसरा खेळाडू ठरला आहे. त्याने हरारे येथे वयाच्या 22 वर्षे 348 दिवसांत शतक झळकावले आहे. त्याच्यापेक्षा लहान वयात विराट कोहली (Virat Kohli) (22 वर्षे 315 दिवस) आणि युवराज सिंग (22 वर्षे 41 दिवस) यांनी हा चमत्कार केला आहे. रोहित शर्माने वयाच्या 23 वर्षे 28 दिवसांत झिम्बाब्वेविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये ही कामगिरी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com