
Shubman Gill Viral Video, Indore ODI: भारतीय क्रिकेट संघाने मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात (IND vs NZ 3rd ODI) न्यूझीलंडचा 90 धावांनी पराभव केला. इंदूरमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात अनुभवी सलामीवीर रोहित शर्मा आणि युवा सलामीवीर शुभमन गिल यांनी शतके झळकावली.
यासह भारताने 3 सामन्यांची वनडे मालिका 3-0 ने जिंकली. युवा सलामीवीर शुभमन गिलसाठी ही मालिका खूप चांगली होती. या मालिकेत त्याने द्विशतक झळकावून विश्वविक्रम केला. आता त्याच्याशी संबंधित एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने (India) किवी संघाला 386 धावांचे कठीण लक्ष्य दिले होते. न्यूझीलंडचा संघ लक्ष्याचा पाठलाग करत असताना चाहत्यांनी गिलसोबत असे कृत्य केले, यासंबंधीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वास्तविक, शुभमन सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करत होता. त्यानंतर चाहत्यांनी साराच्या नावाचा जयघोष सुरु केला. एवढेच नाही तर उपस्थितांनी जोरदार घोषणाबाजी केली.
इंदूर वनडेमध्ये प्रेक्षकांनी साराच्या नावाचा जयघोष केला. चाहते म्हणाले - आमची वहिनी कशी असावी, सारा वहिनीसारखी असावी. हे एकदा नाही तर अनेक वेळा घडले. मात्र गिलने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही आणि चाहत्यांकडे मागे वळूनही पाहिले नाही. अशा स्थितीत तो लालबुंद झाला असावा, असे मानले जाते. गिलचे नाव बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानसोबत जोडले जात आहे. त्याचे सारासोबतचे फोटोही व्हायरल झाले होते.
पंजाबचा 23 वर्षीय शुभमन गिल याने न्यूझीलंडविरुद्धच्या (New Zealand) पहिल्या एकदिवसीय सामन्यात 208 धावांची धडाकेबाज खेळी केली. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय फॉर्मेटमध्ये द्विशतक झळकावणारा तो सर्वात तरुण फलंदाज ठरला. तिसर्या एकदिवसीय सामन्यातही गिलने बाजी मारली आणि 112 धावांची खेळी केली. गिलची मालिकावीर खेळाडू म्हणूनही निवड झाली. त्याने 3 सामन्यात एकूण 360 धावा केल्या.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.