सिद्धार्थ शुक्लाने धोनीच्या निवृत्तीनंतर केलेले 'ते' ट्विट होतेय व्हायरल...
एमएस धोनीच्या (MS Dhoni) निवृत्तीवर सिद्धार्थ शुक्लाने (Siddhartha Shukla) केलेले ट्विट, आता मृत्यूनंतर व्हायरल होत आहे. Dainik Gomantak

सिद्धार्थ शुक्लाने धोनीच्या निवृत्तीनंतर केलेले 'ते' ट्विट होतेय व्हायरल...

सिद्धार्थ शुक्ल (Siddhartha Shukla) याने एक वर्षापूर्वी 15 ऑगस्ट 2020 रोजी धोनीबद्दल (MS Dhoni) एक ट्विट केले होते.सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर आता त्याचे अनेक जुने ट्विट व्हायरल होत आहेत.

एमएस धोनीच्या (MS Dhoni) निवृत्तीवर सिद्धार्थ शुक्लाने (Siddhartha Shukla) केलेले ट्विट, आता मृत्यूनंतर व्हायरल होत आहे. अभिनेता (Actor) आणि बिग बॉस (Big Boss) 13 विजेता सिद्धार्थ शुक्ला याचे हृदयविकाराच्या (Heart disease) झटक्याने निधन झाले. सिद्धार्थच्या मृत्यूनंतर वीरेंद्र सेहवागसह (Virender Sehwag) अनेक क्रीडा दिग्गजांनीही श्रद्धांजली वाहिली आहे.

एमएस धोनीच्या (MS Dhoni) निवृत्तीवर सिद्धार्थ शुक्लाने (Siddhartha Shukla) केलेले ट्विट, आता मृत्यूनंतर व्हायरल होत आहे.
दशक टी -20 संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी: आयसीसीने केले जाहीर

सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर आता त्याचे अनेक जुने ट्विट व्हायरल होत आहेत. यातील एक ट्विट भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी बद्दल आहे. सिद्धार्थ शुक्ल याने एक वर्षापूर्वी 15 ऑगस्ट 2020 रोजी धोनीबद्दल एक ट्विट केले होते.

१५ ऑगस्ट २०२० रोजी संध्याकाळी महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. सिद्धार्थसह अनेकांनी यासंदर्भातील पोस्ट शेअर केली होती. धोनीसोबत सुरेश रैनानेही क्रिकेटला निरोप दिला. आता हे दोन्ही खेळाडू इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळत आहेत.

धोनीच्या निवृत्तीनंतर सिद्धार्थने लिहिले की, इथे बरेच खेळाडू आणि कर्णधार असतील, पण महेंद्रसिंग धोनीसारखा दुसरा कोणी असू शकत नाही. धोनी हा असा कर्णधार ज्याने पुढे येऊन संघाचे नेतृत्व केले आहे. बरेच खेळाडू रेकॉर्डसाठी खेळतात, परंतु तुम्ही जिंकण्यासाठी आणि रेकॉर्ड सेट करण्यासाठी खेळता. भारत तुमची नेहमी तुमच्या खेळाला मिस करेल. टीम इंडियामध्ये योगदान दिल्याबद्दल महेंद्रसिंग धोनी आणि सुरेश रैना या दोघांचे आभार असे ट्विट सिध्दर्थने कले होते. त्याच्या अकाली जाण्याने हे ट्विट अता चांगलेच व्हायरल होत आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com