अर्जुनच्या 'मुंबई इंडियन्स' प्रवेशावर बहिण सारा तेंडूलकरने दिली प्रतिक्रिया

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021

अर्जुनची बेस प्राइस 20 लाख रुपये होती आणि मुंबई इंडियन्सने त्याला याच किंमतीत त्याच्या टीममध्ये सामिल करून घेतले. यावेळी अर्जुनची बहीण सारा तेंडुलकरने त्याचे अभिनंदन केले.

मुंबई: भारतीय संघाचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याला काल गुरुवारी आयपीएल 2021 च्या लिलावात खरेदी करण्यात आले. अर्जुनची बेस प्राइस 20 लाख रुपये होती आणि मुंबई इंडियन्सने त्याला याच किंमतीत त्याच्या टीममध्ये सामिल करून घेतले. यावेळी अर्जुनची बहीण सारा तेंडुलकरने त्याचे अभिनंदन केले.

याचवर्षी अर्जूनने जानेवारीमध्ये सईद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये मुंबईच्या वरिष्ठ संघाकडून पदार्पण केले होते. त्याने 2018 मध्ये अंडर -19 मध्ये पदार्पण केले परंतु 2020 अंडर -19 विश्वचषकात त्याची निवड झाली नाही. जेव्हा अर्जुनची निवड मुंबई इंडियन्सने केली तेव्हा सोशल मीडियावर या निर्णयाला 'नेपोटिझम'शी जोडले गेले. मात्र इकडे आपल्या भावाच्या यशामुळे सारा खूप खूष होती. 'तुझ्याकडून कोणीही हे यश परत घेऊ शकत नाही. हे सर्व तुझे आहे,’ असे कॅप्शन देत तीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून स्टोरी शेअर केली.

अर्जुनवर 'नेपोटिझम' असल्याचा आरोप लावला जात आहे. तरी मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धन यांचे मत वेगळे आहे. जयवर्धन यांनी अर्जुनलना संघात घेण्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. ‘अर्जुनची निवड केवळ त्यांच्या कौशल्याच्या आधारे केली गेली आहे.’ असे मत त्यांनी व्यक्त केले.

"आम्ही फक्त आणि फक्त कौशल्य पाहिले आहेत. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की, सचिन चा मुलगा असल्याने त्याच्याशी खूप मोठे नाव जोडले गेले आहे. पण, सुदैवाने तो गोलंदाज आहे, फलंदाज नाही. सचिन अर्जुनप्रमाणे गोलंदाजी करू शकले असते तर त्यांना खूप अभिमान वाटला असता. मला वाटते की अर्जुनसाठी ही शिकण्याची संधी असेल. त्याने नुकतेच मुंबईकडून खेळण्यास सुरुवात केली आहे. आणि आता तो फ्रँचायझी संघाचा एक भाग आहे. तो शिकेल, तो उत्तम खेळाडू होईल. तो अजूनही तरूण आहे. आणि तो एक अत्यंत तरूण खेळाडू आहे," असे मत जयवर्धन यांनी व्यक्त केले आहे.

ISL2020-21  एटीके मोहन बागानला एएफसी चँपियन्स लीगची संधी; ईस्ट बंगालची प्रतिष्ठा पणास -

संबंधित बातम्या