स्नेहा आणि दिप्तीच्या फिरकीमुळे भारतीय संघाचे सामन्यात पुनरागमन
Sneha and Dipti's spin helped the Indian team return to the match

स्नेहा आणि दिप्तीच्या फिरकीमुळे भारतीय संघाचे सामन्यात पुनरागमन

भारतीय महिला क्रिकेट (Indian women's cricket) संघाने इंग्लंड (England) सोबत सुरु असलेल्या कसोटी (Test) सामन्याच्या कालच्या पहिल्या दिवस अखेर पुनरागमन केले आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी इंग्लंच्या महिला संघाने 6 बाद 269 धावांपर्यंत मजल मारली आहे. भारताकडून फिरकी गोलंदाज स्नेहा राणा आणि दिप्ती शर्मा यांनी इंग्लंच्या संघाला फिरकीच्या जाळ्यात आडकविले. स्नेहाने 77 धावांत 3 तर दिप्तीने 50 धावांत 2 गडी बाद केले. (Sneha and Dipti's spin helped the Indian team return to the match)

जवळजवळ सात वर्षांनी कसोटी सामना खेळत असलेल्या भारतीय संघावर सुरुवातीच्या दोन सत्रात इंग्लंडसंघाचे वर्चस्व होते. 230 धावांत 2 गडी बाद अशा सुस्थितीत इंग्लंडचा संघ होता. परंतु अंतिम सत्रात स्नेहा राणा अणि दिप्ती शर्मा यांनी फिरकीची जादू दाखवत इंग्लंड फलंदाजांना फिरकीच्या जाळ्यात आडकविले यात स्नेहाने 3 तर दिप्तीने 2 गडी बाद करत पहिल्या दिवसअखेर इंग्लंडच्या 6 बाद 269 धावा झाल्या आहेत. 

दुसरीकडे इंग्लंड संघाने सावध सुरुवात केली. परंतु मैदानावर जम बसल्यावर कर्णधार हेदर नाइट आणि टॅमी ब्यूमॉन्ट यांनी शानदार खेळ केला. यात हेदर नाइटने 95 तर टॅमी ब्यूमॉन्ट 66 धावांची खेळी करत पहिल्या दिवस अखेर इंग्लंडला सुस्थितीत नेले आहे. आजच्या दिवसात भारतीय गोलंदाजांना अचूक मारा करत इंग्लंडच्या संघाला कमीत कमी धावांत रोखावे लागेल. यामध्ये फिरकी गोलंदाजांची प्रमुख भूमिका असेल.   

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com