T20 Cricket : गोव्याच्या कर्णधारपदी पुन्हा स्नेहल कवठणकरची निवड

अत्रेय स्पर्धेत नेतृत्व केलेल्या अमोघला वगळले
T20 Cricket Goa Team
T20 Cricket Goa TeamDainik Gomantak

T20 Cricket : गतमोसमात विजय हजारे करंडक एकदिवसीय आणि रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत गोव्याचे नेतृत्व केलेल्या स्नेहल कवठणकर याच्याकडे आगामी सय्यद मुश्ताक अली करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेत संघाचे कर्णधारपद देण्यात आले, मात्र गतमहिन्यात जे. पी. अत्रेय करंडक एकदिवसीय स्पर्धेतील संघनेता अमोघ देसाई याला संघात निवडण्यात आले नाही.

गोवा क्रिकेट असोसिएशनने शुक्रवारी 20 सदस्यीय संघ जाहीर केला. त्यात अनुभवी अमोघला स्थान मिळू शकले नाही. महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचा मुलगा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकर, मुंबईचा अनुभवी हुकमी फलंदाज सिद्धेश लाड व यष्टिरक्षक एकनाथ केरकर हे संघातील ‘पाहुणे’ खेळाडू आहेत.

गोव्याचा संघ 11 ते 22 ऑक्टोबर या कालावधीत टी-20 क्रिकेट स्पर्धेत अनुक्रमे त्रिपुरा, मणिपूर, हैदराबाद, पंजाब, उत्तर प्रदेश, दिल्ली व पुदुचेरी या संघांविरुद्ध खेळेल. गतमोसमातील सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत गोव्याचा संघ एकनाथ केरकर याच्या नेतृत्वाखाली खेळला होता. तेव्हा गोव्याने पाचपैकी दोन सामने जिंकले होते, तर तीन लढती गमावल्या.

T20 Cricket Goa Team
Goa Football Association Election : जीएफए अध्यक्षपदासाठी तिरंगी चुरस

गोव्याचा टी-20 क्रिकेट संघ

स्नेहल कवठणकर (कर्णधार), दीपराज गावकर, वैभव गोवेकर, सुयश प्रभुदेसाई, तुनीष सावकार, अमूल्य पांड्रेकर, दर्शन मिसाळ, अमित यादव, समर दुभाषी, फेलिक्स आलेमाव, लक्षय गर्ग, ऋत्विक नाईक, अर्जुन तेंडुलकर, एकनाथ केरकर, सिद्धेश लाड, ईशान गडेकर, आदित्य कौशिक, विश्वंबर काहलोन, वेदांत नाईक, मोहित रेडकर.

गतमोसमातील स्नेहलचे ‘नेतृत्व’

स्पर्धा सामने विजय पराभव अनिर्णित टाय

एकदिवसीय 5-1-3-0-1

रणजी करंडक 3-0-2-1-0

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com