खूप काही साध्य करायचेय : लेनी

खूप काही साध्य करायचेय : लेनी
Lenny Rodrigie

पणजी

एफसी गोवा संघातून खेळताना अजून खूप काही साध्य करण्याचे ध्येय अनुभवी मध्यरक्षक लेनी रॉड्रिग्ज याने बाळगले आहे. या ३३ वर्षीय खेळाडूने इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत मागील दोन मोसमात संघाकडून सर्व सामने खेळण्याचा मान मिळवलाय.

एफसी गोवाने २०२२ पर्यंत लेनीचा करार वाढविला आहे. आगामी दोन वर्षांत एफसी गोवासाठी हा हुकमी सेंट्रल मध्यरक्षक आधारस्तंभ असेल. मागील दोन मोसमात एफसी गोवा आयएसएल स्पर्धेत खेळलेल्या सर्व सामन्यांत लेनीने संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तो २०१८-१९ मोसमात एफसी गोवा संघात दाखल झालात्या मोसमात संघाने आयएसएल स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत मजल मारलीतर सुपर कप स्पर्धेत विजेतेपद मिळविले.

 एफसी गोवा संघ खूप जवळचा

एफसी गोवा संघातून खेळण्याविषयी लेनीने सांगितलेकी ‘‘व्यक्तिशः मला कुठे राहायचेय याबाबत दुसरा विचार करतच नाही. हा क्लब माझ्या ह्रदयात खूप जवळचा आहे. प्रामाणिकपणे सांगायचं झाल्यासदोन वर्षांपूर्वी या क्लबमध्ये रुजू झाल्यानंतर मी खूप मोठ्या घटनांचा आनंद लुटला आहे आणि मला माझ्या फुटबॉलचा आनंद घेत राहायचेयतसेच संघासाठी आणि गोव्यातील लोकांसाठी आणखीनच गौरव मिळवायचाय.’’ एफसी गोवा संघाचे तत्वज्ञानचाहत्यांचा पाठिंबा आदी आपल्यासाठी योग्य असून येथे राहिल्याने खेळावर पूर्णपणे लक्ष एकाग्र करू शकल्याची लेनीने मान्य केले.

 आगामी मोसम महत्त्वाचा

‘‘क्लबची उत्क्रांती आणि वाटचालीने मी खूप आनंदी आहे. आमच्यासमोर खूप महत्त्वाचा मोसम आहे. आयएसएलमध्ये गतमोसमापेक्षा चांगली कामगिरी करण्यावर आम्हा लक्ष द्यावे लागेल. चँपियन्स लीगच्या आघाडीवरखंडीय पातळीवरील मोठ्या फुटबॉल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करायला मिळतेय हा आमच्यासाठी बहुमान आहे,’’ असे लेनी आगामी मोसमाबद्दल म्हणाला. एफसी गोवापाशी चांगले खेळाडू असल्याचे लेनीला वाटते. ‘‘गतमोसमात आम्ही सेरिटनह्युगोब्रँडन यांच्याशीतर यंदाच्या मोसमात एदू याच्याशी दीर्घकालीन करार केला. विंग्समध्ये रेडीममुळे मोठी भर पडली आहे. आगामी काळासाठी मी खरोखरच उत्साहित आहे,’’ असे लेनी म्हणाला.

 सुधारण्यास अजूनही वाव

मागील दोन मोसम लेनी एफसी गोवाच्या संघ प्रणालीतील महत्त्वाचा दुवा ठरला आहे. त्याची मैदानावरील उपस्थिती आणि परिणामकारक कामगिरी अधोरेखित झालेली आहे. गतमोसमातील आयएसएल स्पर्धेत त्याने भारतीय खेळाडूंत सर्वाधिक पास पूर्ण केले. ‘‘येथे मागील दोन वर्षांत आम्ही एकत्रित भव्य यश मिळविलेतरीही सुधारण्यासाठी अजूनही वाव आहे असे मला वाटते आणि त्यासाठी येत्या वर्षांत मी प्रयत्नशील असेन,’’ अशी कबुली लेनीने दिली.

  एफसी गोवातर्फे लेनी रॉड्रिग्जची कामगिरी

- आयएसएल स्पर्धेत २०१८-१९ व २०१९-२० मोसम

- मध्यफळीत एकूण ४१ सामने२ गोल१ असिस्ट

- सुपर कप विजेतेपद : २०१९

- लीग विनर्स शिल्ड : २०१९-२०

- आयएसएल उपविजेतेपद : २०१८-१९

संपादन - अवित बगळे

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com