सौरव गांगुली यांची पुन्हा प्रकृती बिघडली: खासगी हॉस्पीटलमध्ये केले दाखल

सौरव गांगुली यांची पुन्हा प्रकृती बिघडली: खासगी हॉस्पीटलमध्ये केले दाखल
Sourav Ganguli health deteriorates again He was admitted to a private hospital

कोलकाता:  भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि विद्यमान बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांची तब्येत पुन्हा बिघडली आहे.काल रात्रीपासून त्यांच्या प्रकृती बिघडली. आज बुधवारी दुपारी त्याच्या छातीत दुखू लागल्याने त्यांची तब्येत बिघडली. प्रकृती बिघडल्याने कोलकातामधील एका खासगी रुग्णालयात गांगुली यांना अडमीट करण्यात आले आहे. अशी माहिती मिळाली आहे.

जीममध्ये व्यायाम करत असताना सौरव गांगुलीना ह्रदयविकाराचा झटका आला होता. व्यायाम करताना चक्कर येवून  छातीत दुखू लागल्याने बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांना कोलकाताच्या वुडलँड्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेव्हा त्यांना ह्रदयविकाराचा सौम्य झटका आल्याची बाब उघडकिस आली होती. वूडलँड या खाजगी रूग्णालयात त्याच्यावर उपचार केले गेले होते.

दरम्यान स्जार्ज मिळाल्यानंतर गांगुलीने रुग्णालयातील डॉक्टरांचे आभार मानले होते. गांगुली यांच्या प्रकृतीमध्ये झपाट्याने सुधारणा होत असल्याने त्यांच्यावर होणारी अ‍ॅन्जिओप्लास्टी पुढे ढकलण्यात आली होती.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com