ICC ने सौरव गांगुलीकडे सोपविली मोठी जबाबदारी

BCCI अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांची ICC पुरुष क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी (ICC Men’s Cricket Committee) नियुक्ती करण्यात आली आहे.
ICC ने सौरव गांगुलीकडे सोपविली मोठी जबाबदारी
Sourav GangulyDainik Gomantak

BCCI अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांची ICC पुरुष क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी (ICC Men’s Cricket Committee) नियुक्ती करण्यात आली आहे. आयसीसीने बुधवारी ही माहिती दिली. गांगुली माजी भारतीय खेळाडू अनिल कुंबळे (Anil Kumble) याची जागा घेणार आहे. ज्याने प्रत्येकी तीन वर्षांच्या कमाल कालावधीसाठी जबाबदारी स्वीकारल्यानंतर तीन वेळा पदावरुन पायउतार झाला होता. खेळाशी संबंधित नियम आणि कायदे बनवण्याची जबाबदारी क्रिकेट समितीकडे आहे. कुंबळे प्रमुख असतानाच डीआरएसबाबत निर्णय घेण्यात आला होता. मात्र कोरोनानंतर खेळासंबंधीचे नियमही पुन्हा एकदा नव्याने क्रिकेट समितीनेच बनवले होते.

ICC (International Cricket Council) चे अध्यक्ष ग्रेग बार्कले (Greg Barkley) यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “आयसीसी पुरुष क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी सौरवचे स्वागत करताना मला आनंद होत आहे. जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि नंतर प्रशासक म्हणून त्याचा अनुभव आपल्याला भविष्यात क्रिकेटचे निर्णय घेण्यास मदत करेल. ही जबाबदारी दीर्घकाळ सांभाळल्याबद्दल त्याने अनिल कुंबळेचे आभार मानले. तो पुढे म्हणाला, 'गेल्या नऊ वर्षांत अनिलच्या नेतृत्वाच्या अद्भुत क्षमतेबद्दल मी त्याचे आभार मानू इच्छितो. यामध्ये नियमितपणे आणि सातत्याने डीआरएस वापरुन आंतरराष्ट्रीय सामने सुधारणे आणि संशयास्पद गोलंदाजी कृतींना सामोरे जाण्यासाठी मजबूत प्रक्रियांचा अवलंब करणे समाविष्ट आहे. पुरुषांच्या खेळाप्रमाणे महिला क्रिकेटसाठी प्रथम श्रेणी दर्जा आणि लिस्ट ए पात्रता लागू केली जाईल, असेही बोर्डाने मंजूर केले. ICC महिला समिती पुढे ICC महिला क्रिकेट समिती म्हणून ओळखली जाईल. वेस्ट इंडिजचे सीईओ जॉनी ग्रेव्ह यांची आयसीसी महिला समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे.

Sourav Ganguly
BCCI चे बल्ले-बल्ले! तिजोरीत येणार 1500 कोटी, सौरव गांगुली-जय शाह जोडी कमाल

अफगाणिस्तानसाठी कार्यरत गट

दरम्यान, अफगाणिस्तानमधील (Afghanistan) अलीकडच्या राजकीय घडामोडी लक्षात घेऊन तेथील क्रिकेटचा आढावा घेण्यासाठी आयसीसीने एक कार्यगट तयार केला आहे. त्यात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष रमीझ राजा (President Ramiz Raja) यांचाही समावेश आहे. या कार्यगटाचे नेतृत्व इम्रान ख्वाजा करणार आहेत. त्यात रॉस मॅकॉलम, लॉसन नायडू आणि राजा यांचा समावेश आहे. हा गट येत्या काही महिन्यांत आयसीसी बोर्डाला आपला अहवाल सादर करेल. तालिबानने (Taliban) अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर राजकीय वातावरणात झालेल्या बदलामुळे अफगाणिस्तान क्रिकेटबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.

तालिबानने महिला क्रिकेटला विरोध केला असल्याने त्यांच्या पुरुष संघाची ऑस्ट्रेलियाविरुद्धचा एकमेव कसोटी सामन्यांची मालिका पुढे ढकलण्यात आली. "आयसीसी बोर्ड पुरुष आणि महिला क्रिकेटच्या विकासासाठी अफगाणिस्तान क्रिकेटला पाठिंबा देण्यास वचनबद्ध आहे," असे आयसीसीचे अध्यक्ष ग्रेग बार्कले यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com