सौरव गांगुली लवकरच 'पॉलिटीकल इनिंग' सुरू करणार ?

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 28 डिसेंबर 2020

भारताचं माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली लवकरच 'पॉलिटीकल इनिंग' सुरू करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

कोलकाता :  भारताचं माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली लवकरच 'पॉलिटीकल इनिंग' सुरू करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे, याचं कारण म्हणजे, सौरव गांगुली यांनी पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर यांची घेतलेली  भेट. सौरव गांगुली भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना आता उधाण आलंय.

सौरव गांगुलींनी रविवारी संध्याकाळी पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर यांची भेट घेऊन एक तास चर्चा केली. या भेटीनंतर सौरव गांगुली यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा आहे, परंतु राजभवनाकडून ही सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं गेलंय. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये सौरव गांगुलींना भाजपकडून मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून उभं केलं जाऊ शकतं, अशा चर्चा आहेत. "बंगालचा भूमीपुत्रच पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री बनेल," असं वक्तव्य अमित शाह यांनी आपल्या पश्चिम बंगाल दौऱ्यामध्येच केलं होतं. 
 

संबंधित बातम्या