मुदत संपल्यानंतरही बीसीसीआय अध्यक्षपदी सौरव गांगुली कायम

वृत्तसमस्था
गुरुवार, 10 डिसेंबर 2020

भारतीय क्रिकेट मंडळाने घटनेतील बदलासाठी केलेल्या अर्जावरील सुनावणी जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत लांबणीवर टाकली. त्यामुळे सौरव गांगुली (अध्यक्ष), जय शाह (सचिव) तसेच जयेश जॉर्ज (सहसचिव) मुदत संपल्यानंतरही आपल्या पदावर राहू शकतील.

नवी दिल्ली :  भारतीय क्रिकेट मंडळाने घटनेतील बदलासाठी केलेल्या अर्जावरील सुनावणी जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत लांबणीवर टाकली. त्यामुळे सौरव गांगुली (अध्यक्ष), जय शाह (सचिव) तसेच जयेश जॉर्ज (सहसचिव) मुदत संपल्यानंतरही आपल्या पदावर राहू शकतील.

मंडळाच्या सध्याच्या घटनेनुसार गांगुली आणि शाह यांची पदावरील मुदत संपली आहे, पण त्यापूर्वीच मंडळाने घटनेतील बदलासाठी याचिका सादर केली होती. सुनावणी लांबणीवर गेल्यामुळे त्यांना पदावर राहता येणार आहे. नव्या घटनेच्या विरोधात भारतीय मंडळ, तसेच विविध संलग्न संघटनांनी याचिका सादर केल्या होत्या. न्यायालयीन मित्र पी. एस. नरसिंहा यांनी यातील अनेक अर्जांवर तोडगा काढला आहे, पण त्यानंतरही १४ अर्जांवर सुनावणी आवश्‍यक असणार आहे. न्यायालयास १८ डिसेंबरपासून सुटी आहे. त्यामुळे याबाबतची सुनावणी जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात घेण्याचे ठरले.
सर्वोच्च न्यायालयाने अनेक अर्ज निकालात काढले. निधींबाबतचे अनेक अर्ज आता उपयोगात नसतील, त्याचबरोबर न्यायालयीन मित्रांनी यशस्वी मध्यस्थी केल्यामुळे कर्नाटकसारख्या संघटनांचे अर्ज निकालात निघाले आहेत, असे नरसिंहा यांनी सांगितले. यामुळे भारतीय क्रिकेट मंडळाच्या घटनेत बदल करण्याच्या अर्जावर आज सुनावणीच झाली नाही, असे त्यांनी सांगितले.

 

अधिक वाचा :

चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत झालेल्या वर्णद्वेषी टिप्पणीमुळे लढतच थांबली 

जमशेदपूर एफसीचा व्हॅल्सकिस ईस्ट बंगालसाठी आव्हानात्मक 

 

संबंधित बातम्या