Shai Hope: वेस्ट इंडिजच्या कॅप्टनचा मोठा विक्रम! 'मिस्टर 360' एबी डिविलियर्सलाही टाकलं मागे

वेस्ट इंडिजचा कर्णधार शाय होपने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शनिवारी शतकी खेळी करत एबी डिविलियर्सचा मोठा विक्रम मोडला आहे.
Shai Hope
Shai HopeDainik Gomantak

Shai Hope Century: शनिवारी वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात बफॅलो पार्क, इस्ट लंडन येथे वनडे मालिकेतील दुसरा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात वेस्ट इंडिजने 48 धावांनी विजय मिळवला. या विजयात वेस्ट इंडिजचा कर्णधार आणि यष्टीरक्षक शाय होपने शतकी खेळी करत महत्त्वाचा वाटा उचलला.

या सामन्यात शाय होपने 115 चेंडूत 128 धावांची नाबाद शतकी खेळी केली. होपचे हे कारकिर्दीतील 14 वे वनडे शतक होते. महत्त्वाचे म्हणजे त्याने यातील 10 शतके मायेदेशाबाहेर केले आहेत.

त्यामुळे तो मायदेशाबाहेर सर्वात जलद 10 वनडे शतके करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने 37 वनडे डावातच हा कारमानामा करून दाखवला आहे. त्यामुळे त्याने 'मिस्टर 360' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एबी डेविलियर्सचा विक्रम मागे टाकला आहे. डेविलियर्सने मायदेशाबाहेर 10 वनडे शतके करण्यासाठी 64 डाव खेळले होते.

Shai Hope
SA vs WI: विकेटचं सेलिब्रेशन गोलंदाजाला नडलं! थेट स्ट्रेचवरून नेण्यात आलं मैदानाबाहेर, वर्ल्डकपचंही स्वप्न...

मायदेशाबाहेर सर्वात जलद 10 शतके करणारे फलंदाज

37 डाव - शाय होप

64 डाव - एबी डीविलियर्स

66 डाव - ख्रिस गेल

67 डाव - विराट कोहली

100 डाव - रोहित शर्मा

वेस्ट इंडिजचा विजय

शनिवारी पार पडलेल्या सामन्यात शाय होपच्या शतकी खेळी व्यतिरिक्त प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडिजकडून रोवमन पॉवेलने 46 धावांची खेळी केली. तसेच निकोलस पूरन (39), ब्रेंडन किंग (30) आणि काईल मेयर्स (36) यांनीही छोटेखानी पण महत्त्वाच्या खेळी केल्या. त्यामुळे वेस्ट इंडिजने 50 षटकात 8 बाद 335 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून गेराल्ड कोएझीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

Shai Hope
WPL 2023: दोन संघ प्लेऑफला पात्र, तर तिसऱ्या जागेसाठी चूरस, असे आहे संपूर्ण समीकरण

त्यानंतर 336 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेकडून कर्णधार तेंबा बाऊमाने 118 चेंडूत 144 धावांची खेळी केली. तसेच यष्टीरक्षक फलंदाज क्विंटॉन डी कॉकने 48 धावांची खेळी केली.

मात्र या दोघांव्यतिरिक्त अन्य फलंदाजांना खास काही करता आले नाही. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा डाव 41.4 षटकात 287 धावातच संपुष्टात आला. वेस्ट इंडिजकडून अल्झारी जोसेफ आणि अकिल हुसेन यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तसेच काईल मेयर्स, यानिक कॅरियाह आणि ओडेन स्मिथ यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दरम्यान, या वनडे मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यानंतर आता दुसरा सामना जिंकून वस्ट इंडिजने 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com