नेशन्स लीग फुटबॉल स्पर्धेत जर्मनीचा लाजीरवाणा पराभव

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 19 नोव्हेंबर 2020

जागतिक फुटबॉलमधील ताकद असलेल्या जर्मनीस नेशन्स लीग फुटबॉल स्पर्धेत स्पेनविरुद्ध ०-६ या लाजीरवाण्या पराभवास सामोरे जावे लागले. जर्मनीने ८९ वर्षांनंतर सहा गोलांच्या फरकाने हार पत्करली आहे. 

सेविले :  जागतिक फुटबॉलमधील ताकद असलेल्या जर्मनीस नेशन्स लीग फुटबॉल स्पर्धेत स्पेनविरुद्ध ०-६ या लाजीरवाण्या पराभवास सामोरे जावे लागले. जर्मनीने ८९ वर्षांनंतर सहा गोलांच्या फरकाने हार पत्करली आहे. 

स्पेनने चेंडूवर ७० टक्के वर्चस्व राखले, गोलचे २३ प्रयत्न केले. अव्वल आक्रमक फेरान टॉरेस याची हॅट्ट्रिक हे स्पेनच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले. या विजयासह स्पेनने नेशन्स लीगची बाद फेरी गाठली. या लीगमध्ये जर्मनीची कामगिरी स्पेनपेक्षा सरस होती. जर्मनीस आगेकूच करण्यासाठी बरोबरी पुरेशी होती, तर स्पेनला विजयच हवा होता. या लाजीरवाण्या पराभवामुळे जोशीम लोव यांची मार्गदर्शक पदावरून गच्छंती अपेक्षित आहे. विश्वकरंडक स्पर्धेत जर्मनी साखळीत बाद झाल्यानंतरही लोवच मार्गदर्शक म्हणून कायम राहिले होते. हा आमच्यासाठी काळा दिवस आहे, अशी कबुली लोव यानी दिली. 

पूर्वार्धात तसेच उत्तरार्धात प्रत्येकी तीन गोल स्वीकारलेल्या जर्मनीचा बचाव भक्कम मानला जातो, पण सतराव्या मिनिटांपासून त्यांचा बचाव कोलमडला. दोन वर्षापूर्वी जर्मनी विश्‍वकरंडक स्पर्धेत साखळीत बाद झाले होते, त्यापेक्षा ही हार लाजीरवाणी आहे. यातून मार्चपासून होणाऱ्या विश्‍वकरंडक पात्रता स्पर्धेपूर्वी सावरण्याचे आव्हान जर्मनीसमोर आहे.

 

संबंधित बातम्या