स्विंगच्या किंगचा मास्टर ब्लास्टरला खास संदेश

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 2 एप्रिल 2021

भारताच्या 2011 च्या विश्वजेतेपदाला आज 10 वर्षे पूर्ण झाली आहेत.

जगभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव चिंता वाढवत असताना देशातील अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली. यामध्ये क्रिकेट जगतातील महान खेळाडू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरलाही कोरोनाची लागण झाली. सचिनचे जगभरातील चाहते तो लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत आहेत. यातच पाकिस्तानचा महान माजी गोलंदाज वासीम अक्रमने सचिनला क्रिकेट पदार्पणाची आठवण करुन त्याला प्रोत्साहन दिले आहे. एकिकडे भारताच्या 2011 च्या विश्वजेतेपदाला आज 10 वर्षे पूर्ण झाली आहेत.

मास्टर ब्लास्टरने रोड सेप्टी वर्ल्ड सिरीजमध्ये विजेत्या इंडिया लेजेंड्स संघाचे नेतृत्व केले होते. आश्चर्य म्हणजे सहा दिवसांपूर्वी सचिनला कोरोनाचे निदान झाले. सचिन आज रुग्णालयात दाखल होताच जगभरातील त्याच्या अनेक चाहत्यांनी तो लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना केल्या आहेत. (Special message to the King Blasters Master Blaster)

WIvsSL: सामना कोणीही जिंको, या व्हिडिओनं क्रिकेट चाहत्यांची मनं जिंकली

वासीम अक्रम ट्विटरवरुन म्हणाला, ‘’16 वर्षाचा असताना तू जगातील सर्वोत्तम गोलंदाजांचा निकराने सामना केलास... मला खात्री आहे की, तू कोरोनालाही षटकार मारशील. लवकर ठीक हो मास्टर! 2011 च्या विश्वविजेत्या दशकपूर्तीचा आनंद डॉक्टर आणि रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांसह साजरा केला, तर खूप चांगले होईल. मला फोटो पाठव.’’

1989 मध्ये पाकिस्तानच्या विरोधात मास्टर ब्लास्टरने क्रिकेट जगतात पदार्पण केले होते. त्यावेळी सचिन 16 वर्षाचा होता. त्याने पहिल्या सामन्याच्या डावामध्ये 15 धावा ठोकल्या होत्या. यामध्ये दोन चौकारांचा समावेश होता. या सामन्यातील पाकिस्तानच्या संघात वकार युनुस, अब्दुल कादिर, वासीम अक्रम हे आक्रमक आणि अनुभवी गोलंदाज होते. मात्र मास्टर ब्लास्टरने पदार्पणाच्या मालिकेमध्ये आपल्या फलंदाजीने सर्वांना चकीत केले होते.
 

संबंधित बातम्या