IPL 2021 : आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यात पहिल्यांदाच दिसणार विशेष दृश्य

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 9 एप्रिल 2021

आयपीएलच्या इतिहासामध्ये प्रथमच भारतीय दिव्यांग क्रिकेट परिषद आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्याचा भाग असणार आहेत.

आज सुरु होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 14 व्या हगांमासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) चे सचिव जय शाह यांनी आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यास पहिल्यांदाच भारतीय दिव्यांग क्रिकेट परिषदेच्या प्रतिनीधींना उपस्थित राहण्याचे आमंत्रण पाठवले आहे. आयपीएलच्या इतिहासामध्ये प्रथमच भारतीय दिव्यांग क्रिकेट परिषद आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्याचा भाग असणार आहेत. याबद्दल डिफरेंटली एबल्ड क्रिकेट कौन्सिल ऑफ इंडियाचे (डीसीसीआय) अध्यक्ष महंतेश जीके यांनी बीसीसीआय सचिव जय शाह यांचे आभार मानले आहेत.(A special scene will be seen for the first time in the opening ceremony of IPL)

IPL 2021: सिम्बाच्या गोलंदाजीवर राहणेची फटकेबाजी

महंतेश जीके म्हणाले, "जगातील सर्वात मोठ्या टी-20 स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आम्हाला निमंत्रण दिल्याबद्दल आम्ही जय शाह यांचे आभारी आहोत. सुरुवातीपासूनच ते खूप उत्साही असून दिव्यांग क्रिकेटला सतत प्रोत्साहन देत आहेत. या उद्घाटन सोहळ्यात दिव्यांग क्रिकेट परिषदेचे सर्वच सदस्य उपस्तिथ राहणार आहेत. गेल्या आठवड्यात बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी बीसीसीआयशी संबंधित व्यक्ती तसेच या संघटनेचे अध्यक्ष व सचिव यांना एमए चिदंबरम स्टेडियमवर आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आमंत्रण पाठवले होते. 

भारतीय दिव्यांग क्रिकेट परिषदेला दिलेल्या निमंत्रणाबद्दल बोलताना जय शहा म्हणाले, आयपीएल लीग भारतात होत आल्यामुळे जय शहा खूप खुष आहेत. त्यांनी या उद्धघाटन सोहळ्याला संस्थेचे अध्यक्ष व सचिवांची उपस्थिती राहणार आहे असे  सांगितले. 2020 मध्ये कोरोनामुळे आयपीएल लीग युएईमध्ये घेण्यात आली होती. दरम्यान, आयपीएल 2021 चा पहिला सामना 9 एप्रिलला चेन्नई येथे मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात रंगणार आहे येथे होणार आहे.


संबंधित बातम्या