Goa Professional League: स्पोर्टिंग, धेंपो क्लबची विजयी कामगिरी

धुळेर स्टेडियमवर कळंगुट असोसिएशनवर 3-1 फरकाने, तर फातोर्डा येथील चौगुले मैदानावर धेंपो क्लबने (Dempo Sports Club) एफसी गोवावर 2-1 फरकाने मात केली.
Goa Professional League: स्पोर्टिंग, धेंपो क्लबची विजयी कामगिरी

Goa Professional League

Dainik Gomantak 

पणजी: गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत सोमवारी स्पोर्टिंग क्लब द गोवा, धेंपो स्पोर्टस क्लब या आजी-माजी विजेत्या संघाने विजयाचे पूर्ण तीन गुण प्राप्त केले. स्पोर्टिंगने म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर कळंगुट असोसिएशनवर 3-1 फरकाने, तर फातोर्डा येथील चौगुले मैदानावर धेंपो क्लबने (Dempo Sports Club) एफसी गोवावर 2-1 फरकाने मात केली. 

<div class="paragraphs"><p>Goa Professional League</p></div>
Goa Professional League :वास्कोने `साळगावकर`ला नमविले

कळंगुटविरुद्ध गिरीश नाईकच्या असिस्टवर ॲल्टन वाझ याचे हेडिंग अचूक ठरल्याने स्पोर्टिंगला पाचव्या मिनिटास आघाडी मिळाली. 33 व्या मिनिटास कळंगुटने बरोबरी साधली. स्पोर्टिंगच्या खेळाडूकडून मिळालेल्या बॅकपासवर ज्योवितो फर्नांडिसने स्पोर्टिंगचा गोलरक्षक ओझेन सिल्वा याला चकवले. विश्रांतीला दोन्ही संघ 1-1 गोलबरोबरीत होते. 49 व्या मिनिटास मार्कुस मास्कारेन्हासचा धोकादायक प्रयत्न उमेश पुजारने गोलरेषेवर रोखल्यामुळे स्पोर्टिंगला आघाडीपासून वंचित राहावे लागले. मात्र 52 व्या मिनिटास स्वयंगोलमुळे स्पोर्टिंगला आघाडी मिळाली. मार्कुस मास्कारेन्हासच्या जोरदार फटका कळंगुटचा बचावपटू मेल्विन लोबो याने आपल्याच संघाच्या नेटमध्ये मारला. नंतर अकेराज मार्टिन्सने स्पोर्टिंगच्या विजयावर शिक्कामोर्तब करणारा गोल केला.

धेंपो क्लबने पिछाडीवरून एफसी गोवाला हरविले. ब्रायसन फर्नांडिसने 19 व्या मिनिटास एफसी गोवासाठी गोल केल्यानंतर पूर्वार्धाच्या भरपाई वेळेत पेद्रू गोन्साल्विसच्या गोलमुळे धेंपो क्लबला बरोबरी साधता आली. 62 व्या मिनिटास क्लुसनर परेरा याने केलेला गोल धेंपो क्लबला विजयाचे पूर्ण तीन गुण मिळवून देण्यास कारणीभूत ठरला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com