Clive Miranda of Sporting Club
Clive Miranda of Sporting ClubDainik Gomantak

Goa Professional League : इंज्युरी टाईम गोलमुळे स्पोर्टिंग विजयी

साळगावकर एफसीवर 3-2 फरकाने निसटती मात

Goa Professional League : सामन्याच्या इंज्युरी टाईममध्ये झालेल्या गोलमुळे स्पोर्टिंग क्लब द गोवा संघाने गोवा प्रोफेशनल लीगच्या सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत साळगावकर एफसीवर 3-2 फरकाने निसटती मात केली. सामना बुधवारी म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर झाला.

सामन्यात 2-2 अशी गोलबरोबरी असताना जोएल कुलासो याने 90+2 व्या मिनिटास केलेला गोल स्पोर्टिंगसाठी निर्णायक ठरला. त्यापूर्वी सामनावीर ठरलेल्या क्लाईव्ह मिरांडा याने 41व्या मिनिटास केलेल्या गोलमुळे स्पोर्टिंग क्लब विश्रांतीला एका गोलने आघाडीवर होता.

Clive Miranda of Sporting Club
I-League 2 : धेंपो क्लबची विजयी सलामी

50व्या मिनिटास फेझर गोम्सने साळगावकरला बरोबरी साधून दिली. त्यानंतर दोन मिनिटांत दोन गोल झाले. 54व्या मिनिटास रोहन रॉड्रिग्जच्या गोलमुळे स्पोर्टिंगने पुन्हा आघाडी प्राप्त केल्यानंतर 56व्या मिनिटास मार्क कार्व्हालोच्या गोलमुळे साळगावकर एफसीने बरोबरी साधली होती.

स्पोर्टिंग क्लबचा हा 13 लढतीतील आठवा विजय ठरला. त्यांनी आता गुणतक्त्यात साळगावकर एफसीला गाठले आहे. दोन्ही संघांचे प्रत्येकी 25 गुण झाले आहेत. साळगावकर एफसीला 13 लढतीत दुसरा पराभव पत्करावा लागला

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com