Asia Cup 2023: रोमांचक विजयासह श्रीलंकेची सुपर-4 मध्ये धडक, अफगाणिस्तान आशियामधून कप बाहेर!

Asia Cup 2023: आशिया कप 2023 चा सहावा सामना मंगळवारी श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळला गेला.
 Sri Lanka  Team
Sri Lanka Team Dainik Gomantak

Asia cup 2023: आशिया कप 2023 चा सहावा सामना मंगळवारी श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळला गेला. दोन्ही संघ लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर आमने-सामने आले होते.

श्रीलंकेने अफगाणिस्तानला 291 धावांचे लक्ष्य दिले होते. श्रीलंकेने 50 षटकांत 8 गडी गमावून 291 धावा केल्या. यामध्ये कुसल मेंडिसने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 84 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारांसह 92 धावांची तूफानी खेळी खेळली.

पथुम निसांकाने 41, चरित अस्लंगाने 36, दिमुथ करुणारत्नेने 32 आणि महिश तीक्षणाने 28 धावांचे योगदान दिले. दुनिथ वेललेज 33 धावा करुन नाबाद राहिला. अफगाणिस्तानकडून गुलबदिन नायबने चार आणि राशिद खानने दोन बळी घेतले.

दरम्यान, लाहोरच्या मैदानावर अफगाणिस्तानचा 2 धावांनी पराभव करुन श्रीलंकेचा संघ आशिया कप 2023 च्या सुपर-4 फेरीसाठी पात्र ठरला आहे. आशिया कप 2023 च्या सुपर-4 फेरीसाठी पात्र ठरण्यासाठी अफगाणिस्तान संघाला 37.1 षटकात 292 धावांचे लक्ष्य गाठायचे होते.

श्रीलंकेच्या संघाने अफगाणिस्तानला 37.4 षटकांत 289 धावांत ऑलआउट केले आणि 4 गुणांसह आशिया कप 2023 च्या सुपर-4 फेरीसाठी पात्र ठरले.

या पराभवासह अफगाणिस्तानचा (Afghanistan) संघ आशिया कप 2023 मधून बाहेर पडला आहे. श्रीलंकेशिवाय, बांगलादेश (+0.373 रनरेट) संघानेही गट-बीमधून 2 गुण घेत सुपर-4 फेरी गाठली आहे.

 Sri Lanka  Team
Asia Cup 2023: भारताची सुपर-4 मध्ये धडक, पाकिस्तानविरुद्ध 'या' दिवशी पुन्हा लढत, पाहा संपूर्ण टाईमटेबल

दुसरीकडे, मोहम्मद नबीने अफगाणिस्तानसाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक केले. त्याने मुजीब उर रहमानचा विक्रम मोडला. रहमानने कोलंबोमध्ये पाकिस्तानविरुद्ध 26 चेंडूत अर्धशतक केले होते.

तर राशिद खानने 27 चेंडूत हा पराक्रम केला होता. एकूणच हा विक्रम दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज एबी डिव्हिलियर्सच्या नावावर आहे. ज्याने 2015 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध अवघ्या 16 चेंडूत सर्वात जलद वनडे अर्धशतक झळकावण्याचा विक्रम केला होता.

मेंडिस धावबाद झाला

मेंडिस शतकाकडे वाटचाल करत होता, परंतु दुर्दैवाने तो धावबाद झाला. रशीद खानने त्याला धावबाद केले. मेंडिसने चरिथ असलंका (36 धावा) सोबत 102 धावांची शानदार भागीदारी केली, ज्यामध्ये श्रीलंका 300 हून अधिक धावा करेल असे वाटत होते.

परंतु अफगाणिस्तानच्या फिरकीपटूंनी धनंजय डी सिल्वा आणि कर्णधार दासुन शनाका यांना बाद करुन धावगती कमी केली. अखेरीस महिष तीक्षाणा (28 धावा) आणि दुनिथ वेललेज (नाबाद 33 धावा) यांच्यात आठव्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी झाली.

 Sri Lanka  Team
Asia Cup 2023: रोहित-विराट जोडी 'पाकिस्तान'ला पडणार भारी... रचणार का हा नवा रेकॉर्ड

सर्वाधिक स्ट्राइक रेट असलेला तिसरा फलंदाज

तसेच, मोहम्मद नबी आशिया कप (ODI) मध्ये एका डावात सर्वाधिक स्ट्राईक रेट असलेला तिसरा फलंदाज ठरला आहे. यामध्ये त्याने श्रीलंकेचा (Sri Lanka) दिग्गज सनथ जयसूर्याला मागे सोडले, ज्याने शारजाहमध्ये पाकिस्तानविरुद्ध 200 च्या स्ट्राइक रेटने 15 चेंडूत 30 धावा केल्या होत्या.

एकूणच हा विक्रम बांगलादेशचा फलंदाज शाकिब अल हसनच्या नावावर आहे, ज्याने 16 चेंडूत 275 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या होत्या. तर शाहिद आफ्रिदीने 236 आणि 206.66 च्या स्ट्राईक रेटने हा पराक्रम केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com