IND vs SL: चाहर-भुवीची कमाल, लोअर ऑर्डरनं जिंकलं !

आघाडीचे दमदार फलंदाज स्वस्तामध्ये परत माघारी परतल्यानंतर सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) यशस्वी अर्धशतकी खेळी करत संघाचा डाव सावरला.
IND vs SL: चाहर-भुवीची कमाल, लोअर ऑर्डरनं जिंकलं !
Bhuvneshwar Kumar & Deepak ChaharTwitter/ @ImRitika45

भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) आणि दिपक चाहरच्या (Deepak Chahar) दमदार खेळीने टीम इंडियाला (Team India) दुसरा विजय मिळाला. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातील विजयासह शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्वाखालील भारतीय संघाने तीन सामन्यांची मालिका 2-0 अशी खिशामध्ये घातली. आघाडीचे दमदार फलंदाज स्वस्तामध्ये परत माघारी परतल्यानंतर सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) यशस्वी अर्धशतकी खेळी करत संघाचा डाव सावरला. तो माघारी फिरल्यानंतर टीम इंडिया पुन्हा अडचणीमध्ये सापडली होती. परंतु दिपक चाहर आणि भुवीने आठव्या विकेटसाठी 84 धावांची भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला.

श्रीलंका संघातील (Sri Lankan Team) सलामीवीर फर्नांनडो 50 (71) मध्यफळीमधील असलंकाच्या 65 (68) धावांच्या जोरावर दुसऱ्या सामन्यात श्रीलंका संघाने निर्धारित 50 षटकामध्ये 9 बाद 276 धावा काढल्या होत्या. टीम इंडियाने 3 विकेट आणि 5 चेंडू राखून हे निर्धारित आव्हान पूर्ण केले. दोन विकेट घेणाऱ्या चाहरने मोक्याच्या क्षणी येऊन यशस्वी अर्धशतकी खेळी करत संघाच्या विजयामध्ये मोलाचा वाटा उचलला.

Bhuvneshwar Kumar & Deepak Chahar
SL vs IND: श्रीलंका दौऱ्यासाठी कर्णधार कोण? दोन दिग्गज खेळाडू शर्यतीत

पहिल्य़ा वनडे सामन्यामध्ये श्रीलंकेचा पराभव करत शिखर धवनच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने दमदार सुरुवात केली आहे. मंगळवारी मालिकेमधील दुसरा वनडे सामना होणार आहे. या सामन्यामध्ये विजय मिळत मालिका जिंकण्याचा टीम इंडिया प्रयत्न करेल. तर श्रीलंका संघ बरोबरी साधण्यासाठी मैदानामध्ये उतरेल. पहिल्या सामन्यामध्ये गब्बरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने श्रीलंकेवर सात गडी राखून विजय संपादन केला होता.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com