SL Vs PAK: आर्थिक संकटात फेल झालेली लंका मैदानात पास, पाकचा उडवला धुव्वा

Sri Lanka vs Pakistan: कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानचा 246 धावांनी पराभव केला.
Sri Lanka Team
Sri Lanka TeamDainik Gomantak

Sri Lanka vs Pakistan: कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानचा 246 धावांनी पराभव केला. श्रीलंकेच्या या विजयासह मालिका एक-एक अशी बरोबरीत सुटली. श्रीलंकेने दुसऱ्या कसोटीत मोठी नोंद केली आहे. संघाने पहिल्या डावात सर्वबाद 378 धावा केल्या होत्या. तर दुसरा डाव 360 धावांवर घोषित करण्यात आला. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ पहिल्या डावात 231 धावा आणि दुसऱ्या डावात 261 धावा करत सर्वबाद झाला. याआधी पाकिस्तानने पहिला सामना 4 विकेटने जिंकला होता.

दरम्यान, दुसऱ्या कसोटीच्या शेवटच्या दिवशी पाकिस्तानचा (Pakistan) संघ 261 धावा करुन सर्वबाद झाला. बाबर आझमने 81 धावांची खेळी खेळली. यादरम्यान त्याने 146 चेंडूंचा सामना करत 6 चौकार आणि 1 षटकार लगावला. तर इमाम-उल-हकने 49 धावांची खेळी खेळली. यादरम्यान श्रीलंकेसाठी (Sri Lanka) प्रभात जयसूर्याने शानदार गोलंदाजी केली. त्याने 32 षटकात 117 धावा देत 5 बळी घेतले. विशेष म्हणजे, त्याने 5 मेडन षटकेही टाकली. तर रमेश मेंडिसने 4 बळी घेतले.

Sri Lanka Team
PAK vs SL: 'आम्ही एकत्र जिंकलो...आम्ही एकत्र सेलिब्रेट करू', पाकिस्तानच्या विजयाच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल

दुसरीकडे, या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेबद्दल बोलायचे झाल्यास, बाबर आझम (Babar Azam) सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याने 4 डावात 271 धावा केल्या. तर दिनेश चांदिमलने 4 डावात 271 धावा केल्या. त्यामुळे दोघांनी संयुक्तपणे प्रथम क्रमांक पटकावला. जर आपण सर्वाधिक विकेट घेणार्‍या गोलंदाजाबद्दल बोलायचे झाल्यास, या बाबतीत प्रभात पहिल्या स्थानावर राहिला. त्याने 17 विकेट घेतल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com