श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू अँजेलो मॅथ्यूजचे संघात पुनरागमन 

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 14 जानेवारी 2021

श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यात दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना गॉल येथे गुरुवारपासून सुरु होणार मन्यांत श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू अंजेलो म्याथूजचे 22 सदस्यीय संघात पुनरागमन करआहे.या कसोटी साणार आहे.

कोलंबो:श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यात दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना गॉल येथे गुरुवारपासून सुरु होणार आहे.या कसोटी सामन्यांत श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू अंजेलो म्याथूजचे 22 सदस्यीय संघात पुनरागमन करणार आहे.श्रीलंका संघाचा माजी कर्णधार अंजेलो म्याथूजचा दक्षिण आफ्रिका दौरा मांडीला झालेल्या दुखापतीमुळे हुकला होता.

दिमुथ करुणारत्नेच्या नेतृत्वाखाली संघ घोषीत केला आहे.त्या संघास श्रीलंकेचे क्रीडामंत्री नमल राजपक्षे यांनी समंती दिली आहे.दोन्ही कसोटी सामने कोरोनासंकटामुळे प्रेक्षकांविना खेळवले जाणार आहेत.दुसरा कसोटी  सामना हा 23 जानेवारीपासून खेळवला जाणार आहे. श्रीलंकेच्या संघाची मदार अनुभवी अष्टपैलू खेळाडू अंजेलो म्याथूजवर असणार आहे. दुखापतीतून ठीक झाल्यानंतर पहिल्या कामगिरीसारखी आता त्याची कामगिरी होणार का? यांकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

संबंधित बातम्या