स्टॅमिना क्लबचा शतकी फरकाने विजय

स्टॅमिना क्लबने लिओ स्पोर्टस क्लबला 108 धावांनी हरविले.
स्टॅमिना क्लबचा शतकी फरकाने विजय
स्टॅमिना क्लबचा शतकी फरकाने विजयDainik Gomantak

पणजी: पणजी जिमखान्याच्या बांदोडकर करंडक बाद फेरी क्रिकेट स्पर्धेत आज स्टॅमिना स्पोर्टस क्लबने शतकी फरकाने विजय नोंदविला. त्यांनी लिओ स्पोर्टस क्लबला 108 धावांनी हरविले. सामना कांपाल येथील भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर झाला.

स्टॅमिना क्लबच्या विजयात समीर सावंत (67) याचे अर्धशतक निर्णायक ठरले. पावसामुळे सामना प्रत्येकी 20 ऐवजी 18 षटकांचा करण्यात आला. स्टॅमिना क्लबने प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळाल्यानंतर 8 बाद 148 धावा केल्या. नंतर लिओ क्लबचा डाव अवघ्या 40 धावांत संपला. त्यांच्या एकाही फलंदाजास दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही.

स्टॅमिना क्लबचा शतकी फरकाने विजय
IND vs NZ: टीम इंडिया व्हाईट वॉश साठी सज्ज !

दुपारच्या सत्रातील पावसामुळे गोमेकॉ कँपस आणि अमरावती स्पोर्टस क्लब यांच्यातील सामना झाला नाही. संक्षिप्त धावफलक : 18 षटकांत 8 बाद 148 (समीर सावंत 67 , संदीप राजभर 26 , पृथ्विराज शेळमोणकर नाबाद 23 , सूरज शेट्ये 4-31 , सतीश केरकर 2-9 मनोज हळदणकर 1- 27 ) वि. वि. लिओ स्पोर्टस क्लब : 13.2 षटकांत सर्वबाद 40 (प्रणव साळुंके 3-3 , राहुल नाईक 2-9 , ओंकार मांद्रेकर 2-8 , अर्जुन मोरजकर 1-11 , नयन शिंदे 1-8 ).

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com