IPL मधील या महागड्या खेळाडूची विकेट पडली; गुपचूप चढला बोहल्यावर

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 4 फेब्रुवारी 2021

गेल्या वर्षी मार्चमध्ये 29 वर्षीय जयदेव फनाडकटने रिन्नीशी साखरपुडा केला होता. लग्नाचा कार्यक्रम गुप्तपणे पार पडल्यानंतर उनाडकटने यांनी बुधवारी सोशल मीडियावर ही बातमी जाहीर केली.

गुजरात :  गेल्या हंगामात सौराष्ट्रला रणजी करंडकात यश मिळवून देणारा आणि इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा गोलंदाज जयदेव उनाडकट मंगळवारी गुजरातमधील आनंद येथे एका घरगुती समारंभात आपल्या दीर्घ कालीन मैत्रिण रिन्नीशी विवाहबंधनात अडकला.

INDvsENG : "इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका 'टीम इंडिया'च जिंकणार

गेल्या वर्षी मार्चमध्ये 29 वर्षीय जयदेव फनाडकटने रिन्नीशी साखरपुडा केला होता. लग्नाचा कार्यक्रम गुप्तपणे पार पडल्यानंतर उनाडकटने यांनी बुधवारी सोशल मीडियावर ही बातमी जाहीर केली. त्याने ट्विटरवर लिहिले आहे की, “मला हे सांगताना आनंद होत आहे, आमचा विवाह 2 फेब्रुवारी 2021 रोजी कुटुंब आणि मित्रांच्या उपस्थितीत पार पडला. आपण आमच्यावर दाखवलेल्या सर्व प्रेमाबद्दल आम्ही आभारी आहोत, तुमचे आशिर्वाद असेच राहू द्या."

I-League 2021: पिछाडीवरून मुंबई सिटी विजयी

गेल्या वर्षी संयुक्त अरब अमिरातीमध्ये (UAE) झालेल्या आयपीएलमध्ये उनाडकटने अवघ्या सात सामन्यांमध्ये खेळत चार विकेट पटकावल्या होत्या. एका कसोटी सामन्यासह, 7 एकदिवसीय सामने आणि 10 टी -20 सामने मिळून उनाडकटने आंतरराष्ट्रीय पातळीवर 22 विकेट्स पटकावल्या आहेत.

संबंधित बातम्या