गोव्यात उभारणार मॅराडोना यांचा पुतळा

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 26 नोव्हेंबर 2020

अर्जेटिनाचे महान फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांचा उत्तर गोव्यातील किनारी भागात भव्य पुतळा उभारण्याचा संकल्प राज्याचे मंत्री आणि कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी जाहीर केला.

पणजी : अर्जेटिनाचे महान फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांचा उत्तर गोव्यातील किनारी भागात भव्य पुतळा उभारण्याचा संकल्प राज्याचे मंत्री आणि कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी जाहीर केला. पीटीआय वृत्तसंस्थेनुसार, मॅराडोना यांचा पुतळा पुढील वर्षीपर्यंत पूर्ण होईल. दोन वर्षांपूर्वी लोबो यांनी गोव्यात मॅराडोना यांचा पुतळा उभारण्याची घोषणा केली होती. लोबो यांच्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील मूर्तीकार मॅराडोना यांच्या पुतळ्यासाठी साचा तयार करत असून हे काम पूर्णत्वास आले आहे. 

युवा फुटबॉलपटूंना प्रेरणा मिळावी हा उद्देश असून पुतळा कांदोळी किंवा कळंगुट परिसरात उभारण्यात येईल. स्वर्गीय मॅराडोना यांच्या उंचीचा हा पुतळा पूर्णाकृती असेल, असे लोबो यांनी स्पष्ट केले. मॅराडोना यांचा साडेतीनशे किलो वजनाचा पुतळा हा राज्य सरकारच्या फुटबॉल संस्कृतीला उत्तेजन देण्याचा एक भाग आहे, असेही त्यांनी नमूद केले.
फुटबॉलमधील आणखी एक दिग्गज खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो याचाही पुतळा तयार करण्यात आला असून त्याचीही उत्तर गोव्यातच उभारणी होईल, अशा माहिती लोबो यांनी दिली.

अधिक वाचा :

पेनल्टी गोलमुळे मुंबई सिटी एफसीचा आयएसएलमधील पहिला विजय ; एफसी गोवावर 1-0  ने मात

आज नॉर्थईस्टसमोर केरळा ब्लास्टर्सचे खडतर आव्हान

संबंधित बातम्या