Australian Open : स्टेफनोस सीतीसिपासकडून राफेल नदालला पराभवाचा धक्का  
Stefanos Tsitsipas beat Rafael Nadal in Australian Open

Australian Open : स्टेफनोस सीतीसिपासकडून राफेल नदालला पराभवाचा धक्का  

जागतिक टेनिस क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या राफेल नदालला ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत पराभवाचा सामना करावा लागला आहे. ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत स्टेफनोस सीतीसिपासने राफेल नदालला पराभूत केले. राफेल नदाल आणि स्टेफनोस सीतीसिपास यांच्यातील सामना हा पाच सेट पर्यंत चालला. आणि या सामन्यात स्टेफनोस सीतीसिपासने राफेल नदालवर 3-6, 2-6, 7-6, 6-4, 7-5 अशा अंकाने विजय मिळवत उपांत्यफेरी गाठली. 

राफेल नदाल आणि स्टेफनोस सीतीसिपास यांच्यात झालेला उपांत्यपूर्व फेरीतील सामना चार तास आठ मिनिटे चालला. या सामन्यात राफेल नदालने पहिल्या दोन सेट सहजरित्या आपल्या खिशात घातल्याचे पाहायला मिळाले. मात्र त्यानंतर स्टेफनोस सीतीसिपासने दमदार पुनरागमन करत तिसरा सेट टायब्रेकर मध्ये जिंकला. त्यानंतर पुन्हा चौथा सेट स्टेफनोस सीतीसिपासने  6-4 ने जिंकून सामना पाचव्या सेटपर्यंत पोहचवला. तर, पाचव्या सेट मध्ये पुन्हा एकदा स्टेफनोस सीतीसिपासने धमाकेदार खेळी करत सेट टायब्रेकर जिंकून सामन्यावर वर्चस्व मिळवले. त्यानंतर आता उपांत्य फेरीत स्टेफनोस सीतीसिपासची लढत डॅनियल मेदवेदेवसोबत होणार आहे.

यासोबतच, डॅनियल मेदवेदेव आणि आंद्रे रुबलेव्ह यांच्यात झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात डॅनियल मेदवेदेवने विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. डॅनियल मेदवेदेवने आपल्या कारकिर्दीत पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. डॅनियल मेदवेदेवने आंद्रे रुबलेव्हवर 7-5, 6-3, 6-2 अशा अंकाने विजय मिळवला. तर, यापूर्वी सप्टेंबर 2020 मध्ये डॅनियल मेदवेदेवने यूएस ओपन स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. त्यामुळे यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या स्टेफनोस सीतीसिपास आणि डॅनियल मेदवेदेव यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना चांगलाच चुरशीचा होणार आहे. 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com