स्मिथ- मॅक्‍सवेलला कालच्या सामन्यात काय झालं होतं

- सुनंदन लेले
शनिवार, 28 नोव्हेंबर 2020

ऑस्ट्रेलियाच्या महाकाय धावसंखेत ॲरॉन फिंच आणि स्टीव्ह स्मिथने मोठी शतके केली आणि ग्लेन मॅक्‍सवेलने फटाफट ४५ धावा कुटल्या. त्या तिघांचा खेळ बघून बऱ्याच लोकांना सोशल मीडियावर प्रश्‍न पडला की फिंच- स्मिथ- मॅक्‍सवेलला आत्ता काय झाले?

सिडनी :  ऑस्ट्रेलियाच्या महाकाय धावसंखेत ॲरॉन फिंच आणि स्टीव्ह स्मिथने मोठी शतके केली आणि ग्लेन मॅक्‍सवेलने फटाफट ४५ धावा कुटल्या. त्या तिघांचा खेळ बघून बऱ्याच लोकांना सोशल मीडियावर प्रश्‍न पडला की फिंच- स्मिथ- मॅक्‍सवेलला आत्ता काय झाले? या तिघांचाही यंदाच्या आयपीएलमधला खेळ अत्यंत सुमार झाला होता. ऑस्ट्रेलियन संघाची पिवळी जर्सी घातल्यावर त्यांच्या अंगात स्फुरण संचारले, अशी चर्चा ट्विटरवर चालू होती.

षटकारानंतर सॅनिटायझर

कोविड महामारीनंतर क्रिकेटचे काही नियम बदलले गेले आहेत. पहिल्या सामन्यात मोजके प्रेक्षक उपस्थित होते, त्याचा खेळावर फरक दोन अर्थाने पडला. खेळाडूंना गरजेचे प्रोत्साहन मिळाले. दुसरा म्हणजे जेव्हा जेव्हा षटकार मारला गेला आणि चेंडू प्रेक्षकात गेला तेव्हा मैदानावरील अंपायर चेंडू सॅनिटाईज करून मगच खेळाडूकडे देत होते.

- सुनंदन लेले

 

अधिक वाचा :

कर्णधार विराट कोहलीदेखील रोहितच्या दुखापतीबाबत साशंक

दिल्लीतील प्रदूषित हवा अर्धमॅरेथॉनच्या स्पर्धकांसाठी घातक ठरेल ; डॉक्टरांचा इशारा

आज हैदराबाद एफसीविरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी बंगळूर एफसीची वेगळी व्यूहरचना

 

संबंधित बातम्या