मी पुन्हा येईन; स्मिथ अजूनही पाहतोय कॅप्टन्सीचं स्वप्न

मी पुन्हा येईन; स्मिथ अजूनही पाहतोय कॅप्टन्सीचं स्वप्न
Steve Smith expressed his desire to captain Australia

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि स्टार क्रिकेटर स्टीव्ह स्मिथला पुन्हा एकदा संघाची कमान सांभाळायची  आहे. 2018 मध्ये बॉल टेंपरिंग प्रकरणात त्याच्यावर 1 वर्षासाठी बंदी घालण्यात आली होती. आणि कर्णधारपदाचा त्यागही त्याला करावा लागला होता. स्मिथवर 1 वर्ष क्रिकेट खेळण्यास बंदी घालण्यात आली होती, तर कर्णधारपदासाठी दोन वर्षे बंदी घालण्यात आली आहे. 31 वर्षीय स्मिथ म्हणाला की मला पुन्हा संघाचे नेतृत्व करण्याची इच्छा आहे. न्युज कार्पोरेशनशी बोलतांना त्याने पून्हा कर्णधार होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 

"क्रिकेट ऑस्ट्रेलियाला असे हवे असेल आणि माझे कर्णधार होणे संघासाठी चांगले असेल तर मला असे करण्यास आनंद होईल. त्यामुळे मी संघाते नेतृत्व करू इच्छितो, त्या घटनेतून मला बरेच काही शिकायला मिळाले. वेळ पुढे सरकतो आणि आपण देखील वेळेसोबत पुढे जातो मी गेल्या काही वर्षांत बरेच काही शिकलो आहे आणि एक चांगला व्यक्ती बनलो आहे," असे स्मिथ म्हणाला.

'मला ही संधी मिळाली तर बरं होईल असं मला वाटतं, पण मिळाली नाही, तर काहीही हरकत नाही. मी कसोटी कर्णधार टिम पेन आणि मर्यादित षटकांचे कर्णधार अ‍ॅरोन फिंच यांचे नेहमीच समर्थन केले आहे,'असेही स्मिथ म्हणाला.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com